प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी येथील प्रशांत शंकर गावडे (वय 29) यांने मुलीच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिल्याच्या रागातून रहात्या घरा जवळ अंगावर पेट्रोल ओतुन पेटवून घेतल्याने उपचारासाठी प्रथम गडहिग्लज येथील रुग्णालयात दाखल केले होते.तेथे उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर दाखल करण्यात आले.हा प्रकार मंगळवार (01 मार्च) रोजी रात्री अकराच्या सुमारास घडला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की,प्रशांत हा आपल्या नात्यातील मुलीला लग्नासाठी मागणी घालण्यासाठी नातेवाईकांच्या घरी गेला होता.नातेवाईकांनी लग्नाला नकार देताच त्याने रागाच्या भरात रहात असलेल्या घराजवळ अंगावर पेट्रोल ओतुन पेटवून घेतल्याने भाजून गंभीर जखमी झाला होता.त्याच्या नातेवाईकांनी गडहिग्लज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्याने आपल्या जबाबात तेथील पोलिसांना नातेवाईकांनी पेटवून दिल्याचे सांगितले होते.पोलिसांनी तात्काळ याचा तपास केला असता प्रशांत गावडे यांने नेसरी येथील एका पेट्रोल पंपावर कॅन मध्ये पेट्रोल घेत असल्याचे तेथील सीसीटिव्हित दिसून आल्याने पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता लग्नाला नकार दिल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले.