प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील बांदिवडे येथील रामचंद्र शिवा पाटील (वय 61) हे आज सायंकाळी साडे पाचच्या सुमारास गुंडलकी नावाच्या शेतात असलेल्या विहीरीतील पाणी उपसा करीत असताना पाय घसरून विहीरीत पडल्याने त्यांना बाहेर काढ़ुन बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
त्यांच्या पश्च्यात पत्नी ,एक मुलगा आणि विवाहित दोन मुली आहेत.
Tags
कोल्हापूर