प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी येथील प्रशांत शंकर गावडे (वय 29) यांने मंगळवार (दि.01 एप्रिल) रोजी अंगावर पेट्रोल ओतुन पेटवून घेतल्याने भाजून ग्ंभीर जखमी झाला होता.त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना आज रविवार (दि.06) रोजी सकाळी अकराच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
प्रशांत गावडे यांने नात्यातील मुलीला लग्नाची मागणी घालण्यासाठी गेला होता.मात्र मुलीच्या घरच्यांनी लग्नाला नकार दिल्याच्या रागातून रहात्या घरा जवळ अंगावर पेट्रोल ओतुन पेटवून घेतले होते.गेल्या पाच दिवसांपासून सीपीआर रुग्णालयात उपचार चालू होते.