सिध्दार्थनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भिममय वातावरणात पार पडली

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर : सिध्दार्थनगर येथे  विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती सोमवार (दि.14 एप्रिल) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात सकाळी आ.राजेश क्षीरसागर, सत्यजित कदम यांच्या हस्ते झेंडा वंदन करुन बोधीसत्व गौतम बुद्ध आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दुपारच्या सुमारास 'बोलो रे बोलो, जयभीम बोलो', 'जगात गाजावाजा भीमराव एकच माझा' असा जयघोष करत मंगलमयी वातावरणात संयुक्त सिद्धार्थनगर जयंती उत्सव समितीतर्फे मिरवणूक काढण्यात आली. त्यात मोठ्या संख्येने भीम अनुयायी सहभागी झाले.

 खासदार शाहू छत्रपती, विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे ,माणिक पाटील  यांच्या हस्ते मिरवणुकीला सुरुवात झाली. सिद्धार्थनगर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष करण बनगे, कार्याध्यक्ष ऋषिकेश कांबळे, उपाध्यक्ष रोहन करपे, खजानिस प्रसाद सरनाईक, सेक्रेटरी आशिष घोलप, सुरक्षा सोहनी, माजी नगरसेवक राजू लाटकर, तौफिक मुल्लाणी,रजनिकांत सरनाईक सिध्दार्थनगर येथील महिला बचत गट,तरुण मंडळे या भागातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या महिला मोठ्या संख्येने  उपस्थित होते.                      

   या मिरवणूकीत  लेसर शो, आकर्षक विद्युत रोषणाई, डीजेच्या तालावर आंबेडकरी कार्यकर्ते बेभान होऊन नाचत होते . निळे झेंडे, पांढऱ्या साड्या, निळे फेटे परिधान केलेल्या महिला, पुरुषांसह आबालवृद्ध मिरवणुकीत सहभागी झाले. सिद्धार्थनगर कला क्रीडा मंचच्या मुलींचे नृत्य तसेच  लहान मुलांच्या लेझीम पथकाने वाद्यांच्या गजरात ठेका धरत उपस्थितांचे लक्ष वेधले.योधा बॉईज  गोंडस घोळका ग्रुप, कट्टा ग्रुप आणि इतर तरुण मंडळे सिद्धार्थनगरातील भीम अनुयायांनी विविध प्रबोधनपर कार्यक्रम सादर केले. या मार्गावरील काही  कटआऊटसस योद्धा बाॅईज ग्रुपने उभारल्या होत्या.ही  मिरवणुक सिध्दार्थनगर दसरा चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, कोल्हापूर महानगरपालिका,शनिवार पेठ, जुना बुधवार  पेठ  आणि परत  सिद्धार्थनगर येथे रात्री उशीरा मिरवणुकीची सांगता झाली. या मिरवणूकत खास वैशिष्ट्य 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बँरिस्टर झाल्यानंतर त्यांनी कोल्हापुरात भेट दिली. त्या वेळेचे भव्य कटआऊट मिरवणूकीचे आकर्षण ठरले. राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयीचे प्रबोधनात्मक फलक मिरवणुकीत होते. डॉ. आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या आकर्षक मूर्तीनेही सर्वांचे लक्ष वेधले.

Post a Comment

Previous Post Next Post