प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने क.बावडा परिसरातील अट्टल घरफोड्या सागर भगवान रेणूसे (वय 36.रा.गोळीबार मैदान,क.बावडा) याला अटक करून त्याच्याकडील 20 लाख रुपये किमंतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करून 14 घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या चोरी आणि घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना देऊन पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना दिल्या.
वरिष्ठांच्या आदेशाने पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर तपास पथके तयार करून गुन्हे घडल्या ठिकाणी भेटी देऊन चोरट्यांची चोरी करण्याची पद्धत,ठिकाणे इतर तांत्रिकदृष्ट्या तपास करण्याच्या सूचना दिल्या.या पथकातील पोलिसांनी गेल्या तीन महिन्यापासून क.बावडा येथे होत असलेल्या चोरीच्या घटनामुळे त्या परिसरात सापळा रचून चोरट्याचा शोध चालू होता.या शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्याची माहिती घेत असताना पोलिस अंमलदार हिंदुराव केसरे,सोमराज पाटील,वसंत पिंगळे यांना माहिती मिळाली की,शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा हा सागर रेणूसे यांने केला असून तो सध्या कं.बावडा परिसरात असल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने कं.बावडा येथील गोळीबार मैदान येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांने गुन्हयांची कबुली दिल्याने त्याच्या कडील 175gm. सोन्याचे दागिने आणि 2 कि.650 gm.चांदीचे दागिने असा एकूण 20 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून त्याला पुढ़ील तपासासाठी शाहुपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
त्याच्यावर शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल असलेले 14 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील,अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.धीरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस हिंदुराव केसरे,सोमराज पाटील,वसंत पिंगळे,विलास किरोळकर ,संदिप पाटील,सुरेश पाटील,रुपेश माने ,राम कोळी,कृष्णात पिंगळे,अरविंद पाटील आणि अमित सर्जे यांनी केली.