कोल्हापूर महानगरपालिकेत काही वॉर्डात डमी कामगार काम करीत आहेत.याचा गॉडफादर कोण ?

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - कोल्हापुर महानगरपालिकेत काहीनी डमी कामगार भरुन त्यांचा पगाराचा बोजा कोल्हापूर महानगरपालिकेवर पडून कोल्हापुर महानगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान करीत आहेत.जर कुंपणच शेत खात असेल तर याला आळा कोण घालणार? 

कोल्हापूरातील एका वॉर्डात 48 डमी कामगार काम करीत असून या कामगारांची भरती त्या वॉर्डातील अगोदरच्या आरोग्य निरिक्षकाने केली असल्याचे समजते.त्याची चोकशी करून या सर्वाचा पर्दाफाश होईल का ? अशी विचारणा होत आहे.त्याच प्रमाणे कोल्हापुरात असलेल्या  दोन स्मशानभूमीकडील काही कर्मचारी काही वॉर्डात कामाला असल्याचे सांगतात.तर त्या कर्मचारयांना वॉर्डात विचारले तर स्मशानभूमीत कामाला असल्याचे सांगितले जाते.हे कामगार नेमके काम कुठे करतात याची चौकशी होईल का ? हे जे कामगार काम करीत असल्याचे सांगितले जाते ते कुणाच्या आशिर्वादाने.तसेच काही प्रभागातील कामगार त्याच वॉर्डात रहात असून गेल्या काही वर्षापासून त्याच वॉर्डात काही वेळ काम करुन घरी निघून जात असल्याचे चित्र आहे.त्याच प्रमाणे  कपूर वसाहत येथील एक कर्मचारी एका मंदीराची स्वच्छता  करून आपली अन्य वैयक्तिक काम करीत असल्याची माहिती मिळाली.तर एका वॉर्डातील स्वयं घोषीत मुकादम एका नामांकित असलेल्या हॉस्पिटलच्या परिसरात बासुंदी चहा विकत असून एक झाडू कामगार सकाळी कामाच्या ठिकाणी हजेरी लावून पाटील  नावाच्या हॉस्पिटल परिसरात चहाची विक्री करीत असतो.या सर्वाला या भागातील अगोदरचा आरोग्य निरिक्षक आणि ठोक मानधन वरील आरोग्य निरिक्षक यांनी सवय लावून त्या कामगारांच्या कडुन प्रत्येक महिन्याला 4 ते 5 हजार रुपये घेत असल्याचे समजते.त्याच प्रमाणे दुपारच्या सत्रात हॉटेलचा कचरा गोळा करण्यासाठी कोल्हापुर महानगरपालिकेच्या असलेल्या टिपर गाड्यांचा वापर काही वॉर्डात केला जाऊन संबंधित आरोग्य निरिक्षक आणि त्या गाडीवरील खाजगी ड्रायव्हर हे संगनमताने हॉटेल व्यावसायिकांकडुन 5 ते 8 हजार रुपये घेत असून संबंधिता कडुन कोल्हापुर महानगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान केले जात आहे.यात काही कोल्हापुर महानगरपालिकेच्या काही वरिष्ठांचा यात सहभाग असल्याचे समजते त्या शिवाय एवढ़े मोठे धाडस संबंधितांकडुन होणे शक्य नाही.या सर्वाची चौकशी आयुक्तसो करतील का ?

Post a Comment

Previous Post Next Post