प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने रुईकर कॉलनी येथे असलेल्या रुक्मिणीनगर येथील गुरुनानक सोसायटी जवळील सौदर्य प्रसाधन साहित्याच्या गोदामातील कपाटात ठेवलेली 9 लाख 80 हजार पाचशे रुपयांची रक्कम लंपास केल्या प्रकरणी संशयीत आरोपी गोविंदप्रसाद भवरलाल नायक (वय 23.रा.रतन गेट रोड,विर छापरगाव ,राजस्थान) या परप्रांतियास त्याच्या गावातून अटक करून "48" तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आणला.
कारंडे मळा येथील राजू रामू केसरी यांचे रुक्मिणीनगर येथे सौदर्य प्रसाधन साहित्याचे होलसेल दुकान असून तेथेच त्यांचे गोदाम आहे.त्या गोदामातील कपाटात ठेवलेली 9 लाख 80 हजार पाचशे रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्याने दि.29 मार्च रोजी लंपास केली होती.त्याची फिर्याद राजू केसरी यांनी शाहुपुरी पोलिस दिली.
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
वरिष्ठांच्या सुचने प्रमाणे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे यांचे तपास पथक तयार करून चोरीचा तपास चालू केला सदर पथकाने घटना स्थळी भेट देऊन गुन्हयांचा तपास करीत असताना तपास पथकातील पोलिस अंमलदार शुभम संकपाळ व विशाल चौगुले आणि तपास पथकातील पोलिसांनी घटना स्थळा पासून त्या परिसरात असलेल्या सीसीटिव्ही फुटेज पाहून कोणताही भक्कम पुरावा नसताना मोठ्या कौशल्याने आणि विचारपूर्वक तपास करून सदरचा संशयीत आरोपी परप्रांतिय असल्याचा सुगावा लागल्याने पोलिसांनी त्या आरोपीचे नाव निष्पन्न केले.या पथकातील पोलिसांनी उत्तरप्रदेश येथील गाझियाबाद औद्योगीक वसाहत येथून आरोपी गोविंदप्रसाद नायक याला ताब्यात घेऊन कोल्हापूर येथे आणले.तपास पथकातील पोलिसांनी मोठ्या कौशल्याने गोविंदप्रसाद नायक याच्या तपास करून त्याच्या कडील चोरीस गेलेली 9 लाख 80 हजार पाचशे रुपयांची रक्कम जप्त केली.
सदर आरोपीला अटक केली असून याचा पुढ़ील तपास शाहुपुरी पोलिस करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील,अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.धीरजकुमार बच्चू,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसूटगे पोलिस शुभम संकपाळ,विलास किरोळकर ,विशाल चौगुले ,संदिप बेंद्रे,अमित सर्जे,
अरविंद पाटील,योगेश गोसावी,विजय इंगळे,सचिन पाटील,सागर माने,लखन पाटील,महेश खोत आदीने केली.