रेल्वेच्या धडकेत तरुण ठार .

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - निगडेवाडी येथील  प्रविण प्रकाश निगडे (वय 25) याला लोहिया मार्केट जवळ असलेल्या जुना सकाळ प्रेस येथे  कोल्हापूरहून गोंदियाकडे जात असलेल्या रेल्वेने धडक दिल्याने त्याला बेशुध्दावस्थेत रुग्णवाहिकेतुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे उपचारापूर्वी मृत्यु झाला.हा प्रकार बुधवार (दि.09 मार्च) रोजी सायंकाळ चारच्या सुमारास घडला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

प्रविण निगडे हा जन्मताच मुकबधीर असून तो गांधीनगर येथे एका फर्निचरच्या दुकानात कामाला होता.तो नेहमी आपल्या मोटारसायकल वरुन कामाला जात.आज नेहमी प्रमाणे मोटारसायकल वरुन कामाला गेले होते.दुपारी घरी येऊन परत गांधीनगर येथे मोटारसायकल वरुन जाऊन आपली मोटरसायकल रेल्वे स्टेशनच्या बाजूला उभी करून रेल्वे रुळावरुन जात असताना त्याच्या पाठीमागून येत असलेल्या रेल्वेने धडक दिल्याने ते तेथेच खाली पडले तेथे उपस्थित असलेल्या डेप्युटी सरपंच यांनी त्याच्या नातेवाईकांना माहिती दिली.

 कोल्हापूर गोंदिया ही रेल्वे नेहमी तीन ते सव्वा तीनच्या दरम्यान सुटते.आज एक तास उशीराने सुटली. त्याच्या पश्च्यात आई-वडील आणि तीन बहिणी आहेत.

त्याच्या पश्च्यात आई-वडील आणि तीन बहिणी आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post