टाऊन हॉल एसटी बस स्थानक पूर्ववत चालू होण्यासाठी एसटी विभागाचे डोळे कधी उघडणार !

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - टाऊन हॉल एसटी बस स्थानक पाडून दोन ते तीन वर्षे झाली असून एसटी बस स्थानक बांधण्यास अजून एसटीच्या संबंधित विभागाला अजून मुहूर्त सापडलेला नाही.या स्थानकाची अवस्था दयनीय झाली आहे.टाऊन हॉल एसटी बस स्थानक हा कोकण हायवे असल्याने या थांब्या वरुन रत्नागिरी ,मलकापूर ,पन्हाळा,       कोतोली,जोतिबा आणि विशाळगड आदी मार्गावर प्रवास करत असलेले शालेय विद्यार्थी,नोकरवर्ग या स्टॉप वर एसटीची वाट पहात थांबतात.त्यांना बसण्यासाठी किंवा उभारण्यासाठी कोणतेही निवारा शेड नसल्याने रस्त्यावर उभे राहून एसटीची प्रतिक्षा करत असतात.या ठिकाणी वहातुकीची मोठी वर्दळ असल्याने अपघात होण्याची शक्यता असते.या स्थानकावर प्रवाशांची आणि बाहेरुन येत असलेल्या पर्यटकांची गर्दी होत असल्याने बसण्यासाठी आणि उभारण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने उन्हाळ्यात उन्हाचे चटके सहन करत आणि पावसाळ्यात थांबण्यासाठी  आडोसा नसल्याने भिजत उभे रहावे लागत आहे.यावर कहर म्हणजे तेथून वहात असलेले  आणि तुंबलेले गटारीचे शौचालयाचे सांडपाणी यातच कुणी तोंडाला हात लावून तर कुणी रुमाल लावून थांबलेले असतात.यातूनच अपघाता सारखे प्रसंग घडत असतात.या ठिकाणी उन्हाळ्यात पिण्यासाठी पाण्याची कोणतीही सोय नाही.त्याच प्रमाणे लेडीज साठी स्वच्छतागृहाची कोणतीही सोय नाही.

सरकारने एसटी विभागाला उर्जितावस्था देण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न चालू आहेत.75 वर्षावरील लोकांना मोफत प्रवास ,ज्येष्ठांना अर्धे तिकिटांचा प्रवास आणि महिलांना निम्म्या तिकीटात प्रवास अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.त्याच प्रमाणे या टाऊन हॉल एसटी बस स्थानकावरून प्रवास करत असलेल्या प्रवाशांना ,वयोवृध्द ,महिला, नोकरदार,विद्यार्थी यांच्या साठी पक्के एसटी बस स्थानक बांधून होई पर्यंत तात्पुरते निवारा शेड उभे करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

टाऊन हॉल एसटी बस स्थानकासाठी सोशल मिडिया ,प्रिंट मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियायाने अनेक वेळा वाचा फोडली पण एसटीच्या संबंधित विभागाने जाणून बुजून दृर्लक्ष केले जात आहे.त्याच प्रमाणे काही प्रवाशांनी व नोकरदार वर्गाने एसटीच्या संबंधित विभाला भेटून निवेदन सुध्दा दिले.मात्र या विभागाचे अजून डोळे उघडलेले नाहीत.यात्रा काळात एसटीने एका दिवसात अमुक कोटी,अमुक लाख मिळविले म्हणून डंका वाजविते तर मग टाऊन हॉल एसटी बस स्थानक का उभारत नाही ? अशी प्रवासी वर्गातून विचारणा होत आहे.

जर संबंधित एसटी विभाग प्रवाशांच्या मागणीला दुर्लक्ष करत असेल तर एसटी महामंडळाचे महावितरण व्हायला वेळ लागणार नाही असे काहींचे मत आहे.

एसटीच्या संबंधित विभागाच्या अधिकारी यांनी स्वतःच जागेवर जाऊन प्रवासी वर्गाचे होत असलेली गैरसोय पहावी.

आता पावसाळा सुरू होण्या अगोदर तात्पुरते निवारा शेडची सोय करावी अशी मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post