प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कोल्हापुरात देवदर्शनासाठी आलेल्या शंकर जालिंदर गवळीकर (वय 30.रा.मिरकल बसवकल्याण ,जि.बिदर कर्नाटक) याचा पंचगंगा नदी पात्रात पोहण्यास गेला असता बुडून मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
शंकर गवळीकर हे बांधकाम मिस्त्री असून रविवार (दि.06) रोजी आपल्या मित्रा सोबत देवदर्शनासाठी पहाटे चारच्या सुमारास आले.ते सर्व जण आंघोळी साठी पंचगंगा नदी येथे गेले होते.त्याचे इतर साथीदार नदीत बाजूला आंघोळ करीत होते.शंकर याला पोहता येत नसतानाही पळत जाऊन नदीत उडी मारल्याने तो बुडू लागला.हा प्रकार त्याच्या साथीदाराच्या लक्षात येताच त्यांनी आरडा ओरडा केला .तेथे पोहण्यासाठी आलेल्या इतर नागरिकांनी अग्निशामक दलाला माहिती दिली.अग्निशामक जवानांनी पाण्यात गळ टाकून आणि जीवरक्षक उदय निंबाळकर यांनी पाण्यात शोध घेऊन शंकर गवळीकर याला पाण्याबाहेर काढ़ुन बेशुध्दावस्थेत खाजगी वाहनाने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.हा प्रकार आज सकाळी पहाटे पाचच्या सुमारास घडला.
त्याच्या पश्च्यात आई आणि चार भाऊ आहेत.