मुंबईतील एकाची कोल्हापुरात गळफास घेऊन आत्महत्या.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - सांताक्रूझ (मुंबई) येथील अमित रमेश सावंत (वय 48) हे कोल्हापुरातील हॉटेल सह्याद्री येथे उतरले होते.त्यांनी त्या हॉटेल मधील रुम नं.306 मध्ये पंख्याच्या लोखंडी हुकाला नायलॉन दोरीने गळफास लावून घेतल्याने याची माहिती शाहुपुरी पोलिसांना मिळाली.शाहुपूरी घटना स्थळी जाऊन पंचनामा करून पंख्याला बांधलेली वरुन दोरी सोडवून बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.हा प्रकार बुधवार (दि.23) रोजी घडला होता.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post