प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - खंडणी आणि दरोड्यातील फरारी आरोपी विशाल उर्फ(गोट्या लातूर) अविनाश माने (वय 25) व अजय उर्फ (आज्या लातूर) अविनाश माने (वय 30.दोघे रा.राजारामपुरी 14 वी.गल्ली,कोल्हापूर ) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांना पुढ़ील तपासासाठी गोकुळ शिरगांव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी गंभीर गुन्हयांतील फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना दिल्या होत्या.
वरिष्ठांनी दिलेल्या आदेशा प्रमाणे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तपास पथके तयार करून गोकुळ शिरगांव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणी व दरोडा या गंभीर गुन्हयांतील आरोपी गुन्हा दाखल झाल्या पासून पसार होते.सदर आरोपींचा शोध घेत असताना पोलिस अंमलदार वैभव पाटील यांना माहिती मिळाली की,सदर गुन्हयांतील आरोपी पुणे येथील चाकण परिसरात असल्याची माहिती मिळाली.सदर पथकाने चाकण येथे जाऊन वरील आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली.हे आरोपी मोका कारवाईतील असून ते जामिनावर बाहेर आले होते.त्यांची राजारामपुरी परिसरात दहशत होती.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.धीरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलिस वैभव पाटील,अरविंद पाटील,महेंद्र कोरवी,प्रविण पाटील,विशाल खराडे,परशुराम गुजरे,शिवानंद मठपती,योगेश गोसावी,संतोष बर्गे आणि गजानन गुरव यांनी केली.