प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - आपल्या मित्रा समवेत स्पोर्टस् बाईक वरून सहली साठी आजरा येथे गेलेल्या सिध्देश विलास रेडेकर (वय 24.रा.कसबेकर पार्क,महावीर कॉलेज समोर,को) याचा आंबोली आजरा रोडवरील मडलगे गावा जवळ झालेल्या कारच्या आणि मोटारसायकलच्या धडकेत मृत्यु झाला.हा प्रकार रविवार (दि.20 एप्रिल 25) रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
सिध्देश हा इंजिनिअरचे शिक्षण घेत होता.त्याचे वडील नामवंत उद्योजक आहेत.सिध्देश याला स्पोर्टस् बाईक रायडींगचा छंद होता.आज सकाळी सहाच्या सुमारास आपल्या मित्रासह चौघेजण स्पोर्टस् बाईक वरून आजरा येथे गेले होते.ते परत येत असताना आंबोली आजरा रोडवर मडलगे गावा जवळ आले असता त्यांच्या बाईकची एका कारला जोराची धडक झाल्याने हेल्मेट घातलेल्या सिध्देश याचे हेल्मेट उडून डोक्यास मार लागल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला होता.जखमी सिध्देश याला उपचारासाठी प्रथम आजरा ,गडहिग्लज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला. त्याच्या पश्च्यात आई-वडील,बहिण भाऊ असा परिवार आहे.
त्याच्या अपघाताची माहिती समजताच त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्र परिवारांनी सीपीआर आवारात मोठी गर्दी केली होती.मनमिळावू असलेला सिध्देश याचा अशा प्रकारे मृत्यु मुळे त्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.