प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कागल - कागल येथील एसटी डेपो समोर मोटारसायकल वरुन पडल्याने गंभीर जखमी झालेला समीर किरण कांबळे (24 रा.आंबेडकर नगर ,निपाणीवेस ,कागल) याचा सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
समीर कांबळे हा (दि.14 एप्रिल 25 ) रोजी सकाळी माणगांव येथे ज्योत आणण्यासाठी गेला होता.ज्योत घेऊन परत आपल्या मित्रा समवेत मोटारसायकल वरुन घरी परत येत असताना त्या वेळी कागल येथील एसटी डेपो जवळ अचानक ब्रेक मारल्याने मोटारसायकल स्लिप होऊन मध्ये बसलेला समीर हा मोटारसायकल वरुन उडाल्याने त्याच्या डोक्यास दुखापत झाल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना गुरुवार (दि.17 एप्रिल 25) रोजी सायंकाळी मृत्यु झाला.त्याच्या पश्च्यात आई आणि दोन बहिणी आहेत.