प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने तिघां मोटारसायकल चोरट्यांना अटक करून 8 लाख रुपये किमंतीच्या 14 मोटारसायकली जप्त करून मोटारसायकल चोरीचे 10 गुन्हे उघडकीस आणले.या प्रकरणी अक्षय राजू शेलार (वय 24.रा.लिगाडे मळा,भोने माळ ,इंचलकरंजी,सध्या रा.बेघर वसाहत,शाहूनगर ,कागल) विनायक बाळू गवळी (वय 22.रा.बेघर वसाहत,शाहूनगर ,कागल) आणि चंद्रदिप कुलदिप गाडेकर (वय 23.रा.संत रोहिदास चौक ,कागल सध्या रा.चांभारखडी ,कागल) यांना अटक केली.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.वरिष्ठांच्या आदेशाने पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांचे तपास पथक नेमून मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या .
सदर पथकाने मोटारसायकल चोरट्यांचा शोध घेत असताना अंमलदार सागर चौगुले यांना चोरीतील मोटारसायकली विक्री करण्यासाठी तिघे चोरटे कागल येथील कागल एसटी डेपो येथे येणार असल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व त्यांच्या पथकाने दि.05 एप्रिल 25.रोजी कागल एसटी डेपो येथे सापळा रचून अक्षय शेलार ,विनायक गवळी आणि चंद्रदिप गाडेकर या तिघांना ताब्यात घेतले.त्यांच्यावर मोटारसायकल चोरीचे शिवाजीनगर आणि कागल पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून त्यांच्याकडे यामाहा मोटारसायकल व स्प्लेंडर मोटारसायकल अशा दोन मोटारसायकल व गुन्हयांत वापरलेली मोटारसायकल अशा तीन मोटारसायकली जागीच मिळून आल्या.त्यानंतर या तिघांच्याकडे मोठ्या कौशल्याने तपास केला असता त्यांनी इंचलकरंजी,कागल,गोकुळ शिरगांव ,इस्पुर्ली,कबनूर ,कुंरुदवाड ,निपाणी कर्नाटक येथून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांच्या कडील आणखी 12 मोटारसायकली जप्त करून मोटारसायकल चोरीचे 10 गुन्हे उघडकीस आणले.या तिघांना पुढ़ील तपासासाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.धीरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलिस सागर चौगुले,युवराज पाटील,राजू कांबळे,समीर कांबळे,अशोक पोवार,सतीश जंगम,विलास किरोळकर,अमित सर्जे,नामदेव यादव ,यशवंत कुंभार ,कृष्णात पिंगळे आणि विनायक बाबर यांनी केली.