रुक्मिनीनगर येथे सौदर्य प्रसाधन होलसेल साहित्याच्या गोदामातून पावणे दहा लाखांची रक्कम लंपास.चोरटा सीसीटिव्हित कैद.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- रुक्मिनीनगर येथे राजू रामू केसरी (रा.कारंडे मळा,कोल्हापूर ) यांचे गुरुनानक सोसायटी समोर सौदर्य प्रसाधनचे होलसेल दुकान असून तेथेच साहित्य ठेवण्यासाठी गोदाम आहे.त्या गोदामाच्या कपाटात ठेवलेली पावणे दहा लाखांची रक्कम अज्ञात चोरट्यांने लंपास केल्याची घटना घडली.हा प्रकार शनिवारी दुपारच्या सुमारास घडला असून याची फिर्याद राजू केसरी यांनी बुधवारी रात्री उशिरा शाहुपुरी पोलिस ठाण्यात दिली.

सदरचा चोरटा सीसीटिव्हीत कैद झाला असून त्याचे नाव पोलिसांना निष्पन्न झाले असून त्याच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत.लवकरच संशयीत चोरट्यास अटक करून त्याच्या कडील चोरीतील रक्कम हस्तगत करण्यात येणार असल्याचे तपास पथकातील पोलिसांनी सांगितले.

राजू केसरी यांचे रुक्मिनीनगर येथे सौदर्य प्रसाधन साहित्याचे होलसेल दुकान आहे.त्याच ठिकाणी साहित्य ठेवण्यासाठी गोदाम आहे.शनिवारी दुकान मालक राजू केसरी यांच्यासह सर्व कामगार मार्केटिंग साठी बाहेर गेले होते.त्या वेळी दुपारी चार ते सायंकाळी सातच्या दरम्यान  अज्ञात चोरट्याने गोदामात प्रवेश करून कपाटात ठेवलेली पावणे दहा लाखांची रक्कम लंपास करुन चोरट्याने रहात असलेल्या टेरेसच्या मागील बाजूने दोर बांधून त्यावरून पळून गेला.

घटना स्थळी पोलिस उपअधीक्षक अजित टिके,स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर  आणि शाहुपुरीचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी भेट देऊन पाहणी केली.

या घटनेतील संशयीत चोरटा सीसीटिव्हीत कैद झाला असून तो परप्रांतिय असल्याचे दिसून येते.त्याच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली असून त्याचा लवकरच छडा लागण्याची शक्यता असल्याची माहिती तपास पथकातील पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post