प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील कुर्डू येथील तानाजी बळवंत पाटील (वय.43) याला त्याच्या चुलत भावांनी तानाजी पाटील याच्या पाठीवर पायावर ,हातावर काठीने मारहाण करून त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.हा प्रकार सोमवार (दि.07 मार्च) सकाळी आठच्या सुमारास घडला. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
तानाजी पाटील हे कोल्हापूर येथे सिक्युरीटी गार्ड म्हणुन नोकरी करतात. आज सकाळी नाईट ड्युटी करुन घरी जात असताना त्यांच्या मालकीचे गावातील रस्त्याच्या कडेला शिव नावाचे शेत आहे.त्यांच्या शेतात जेसीबीसह कॉम्प्रेसर मशीन असल्याचे आढ़ळल्याने त्यांनी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष यांना घेऊन शेतात गेले.त्या वेळी त्यांचे नात्याने चुलत भाऊ त्या शेतातून पाईप लाईन घालत होते.त्या वेळी तानाजी पाटील यांनी हरकत घेऊन आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढ़ु लागल्याने त्याच्या चुलत भावानी त्याचा मोबाईल हिसकावून घेऊन मोबाईल फोडण्याचा प्रयत्न केला.या कारणातुन त्यांच्यात वाद होऊन त्या तिघां-चौघांनी संगनमत करून तानाजी पाटील याला शिवीगाळ करुन मारहाण करु लागले.त्या वेळी तेथे उपस्थित असलेले तंटामुक्तीचे अध्यक्ष यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता त्या तिघां-चौघांनी त्यांनाही धक्काबुक्की करून बाजूला हो म्हणत तानाजी पाटील याच्या पाठीवर,हाता-पायावर काठीने मारहाण करून त्यातील एकाने तानाजी पाटील यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने हल्ला करून ग्ंभीर जखमी केले.तानाजीच्या डोक्यात रक्तस्त्राव झाल्याने याची माहिती नातेवाईकांना समजताच तात्काळ शेतात जाऊन जखमीला त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी इस्पुर्ली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.तेथे उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.हा प्रकार आज सोमवार (दि.07 मार्च) रोजी सकाळी आठच्या सुमारास घडला.