जोतिबा मंदिर येथील गैरप्रकार थांबवावेत- भाजपा मंडल अध्यक्ष प्रकाश सरनाईकांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी.

 


  ( प.महाराष्ट्र देवस्थानचे शिवराज नाईकवडे यांना   निवेदन देताना भाजपचे प्रकाश सरनाईक व जिल्हा    दिव्यांग प्रतिनिधी विवेक पाटील.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या नियंत्रणात येणाऱ्या जोतिबा मंदिर येथे गुढीपाडव्याच्या दिवशी दर्शन रांगेतून दर्शन घेण्यासाठी गेलेल्या भाजप पदाधिकारी प्रकाश सरनाईक यांना बंदोबस्तासाठी  असलेल्या सुरक्षा रक्षकाने विनाकारण  धक्काबुक्की केली. त्या अनुषंगाने गुरुवारी (ता.३) भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी, सह.कामगार आयुक्त व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिव यांना निवेदन देण्यात आले.

   या निवेदनात म्हंटले आहे कि, जोतिबा मंदिर येथे रांगेने गेलेल्या भक्तांना देवस्थान समितीकडुन बंदोबस्तासाठी असलेल्या  कर्मचारी व सुरक्षा रक्षकांकडून नाहक त्रास दिला जातो.                दोन वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार  जोतिबा व महालक्ष्मी मंदिर येथे व्हीआयपी दर्शन बंद केल्याचा दावा देवस्थान समिती करते.मात्र  आजही आर्थिक मोबदला घेवून व्हीआयपी दर्शन सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. पैसे घेवून जोतिबा देवस्थान अधिकारी व कर्मचारी परजिल्ह्यातील नागरिकांना व्हीआयपी दर्शन देतात. असा गंभीर आरोप प्रकाश सरनाईक यांनी केला. 

 यावेळी दिव्यांग संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी विवेक पाटील म्हणाले, दिव्यांग नागरिकांना दर्शन रांगेतून दर्शन घेणे त्रासदायक ठरत असल्याने दिव्यांग नागरिकाला व त्यांच्यासोबत असणाऱ्या एका व्यक्तीला व्हीआयपी प्रवेश ग्राह्य धरण्यात यावा. 

 या घटनेची दखल घेवून जिल्हाधिकारी यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच दिव्यांगांना दर्शन घेण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी अखिल भारतीय जनरल व असंघटित कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष अभिजित ढवण, निनाद बेलेकर, दिव्यांग नागरिक व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post