प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कागल तालुक्यातील माद्याळ येथील दिनकर कृष्णा राणे(वय 75) याच्या कडुन शेतात लावलेला 21 कि.957gm. वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी अवैद्य अंमली पदार्थांचा साठा आणि विक्री व शेती करीत असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
वरिष्ठांनी दिलेल्या सुचने प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तपास पथके तयार करून रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना पोलिस अंमलदार समीर कांबळे यांना माहिती मिळाली की ,माद्याळ गावात असलेल्या कोंडार या ठिकाणी असलेल्या ऊसाच्या शेतात एकाने गांजाच्या झाडाची लागवड केल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी आपल्या पोलिस पथकासह सदर ठिकाणी जाऊन (दि.15 एप्रिल ) रोजी छापा टाकून दिनकर राणे याला ताब्यात घेऊन त्याच्या कडील 21 कि.957 gm.वजनाचा ओला गांजा व इतर साहित्य असा एकूण दोन लाख 20 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर मुरगूड पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला पुढ़ील तपासासाठी मुरगूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर,सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस समीर कांबळे,अशोक पोवार राजू कांबळे,प्रशांत कांबळे यांच्यासह आदीने केली.