प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- ए.एस.ट्रेडर्सच्या संचालकांनी जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणी ए.एस.ट्रेडर्स कंपनीचा डायरेक्टर विजय ज्योतिराम पाटील ( रा.लाखे गल्ली ,शिंदेवाडी ,खूपीरे ता.करवीर ) यांच्या नावे असलेली आलिशान जॅग्वार कार (MH -09-FX- 4654 ) ही सिल्व्हर गुडस कंडोनियम सोसायटी,पिंगळे वस्ती,मुढ़वा ,पुणे येथे असल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकातील पोलिस अंमलदार विजय काळे,राजू येडगे,राजेंद्र वरंडेकर यांनी पुणे जाऊन सदरची आलिशान कार जप्त करून कोल्हापूर येथे आणली.
या गुन्हयांचा तपास पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली ,आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या पर्यवेक्षणाखाली तपास अधिकारी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर आणि त्यांचे तपास पथक करीत आहेत.