प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - शिराळा तालुक्यातील मांगले येथील सत्यजित संजयसिंह पाटील (वय 25) यांने सोमवार (दि.07 एप्रिल ) रोजी दुपारी साडे पाचच्या सुमारास राधानगरी येथील जेनेसिस कॉलेज परिसरात किटक नाशक औषध सेवन केल्याने त्याला उपचारासाठी बेशुध्दावस्थेत 108 रुग्णवाहिकेतुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
सत्यजीत पाटील यांचे मुळगाव गिरोली येथील असून त्याचे आई वडील लहानपणी वारल्याने तो मांगले येथे आजोळी रहात होता.सध्या तो आणि त्याची विवाहित बहिण आहे.सत्यजीत याला राधानगरी येथील एका कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून दोन दिवसात हजर होणार होता.त्याच्या घरी जॉब साठी जात असल्याचे सांगून राधानगरी येथे गेला .तेथे गेल्या नंतर तेथे त्यांने मोबाईलवर किटक नाशक घेत असलेला स्टेटस ठेवून नातेवाईकांना आणि मित्रांना पाठविला होता.हा स्टेटस त्याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी पाहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार चालू आहेत.