प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- पन्हाळा तालुक्यातील कळे येथील शेतकरी हिंदुराव शंकर पाटील (वय 55) हे वैरणीचा भारा घेऊन घरी येत असताना बांधावरुन पडल्याने वैरणीचा भारा त्यांच्या मानेवर पडून गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारा पूर्वी मृत्यु झाला.हा प्रकार बुधवार (दि.02 मार्च) रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
हिंदुराव पाटील रोज शेताकडे फिरायला जाऊन येताना जनावरांना वैरण घेऊन येत असतात.आज नेहमी प्रमाणे टाक्याचा माळ येथे फिरायला गेले होते.येताना जनावरांना डोक्यावरुन वैरण घेऊन घरी येत असताना अचानक पाय घसरून बांधावरुन भारा घेऊन पडल्याने हा भारा त्यांच्या मानेवर पडला होता.त्यात ते ग्ंभीर जखमी होऊन शेतातच पडले होते.याची माहिती काहीनी त्यांच्या नातेवाईकांना फोन वरुन दिली असता नातेवाईकांनी शेतात धाव घेत शेतात पडलेल्या हिदुराव पाटील यांना सीपीआर रुग्णालयात हलविले मात्र त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.
त्यांच्या पश्च्यात पत्नी ,दोन मुले आणि सुना आहेत.