प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - स्थानिक गुन्हे अण्वेषण पथकाने परप्रांतिय चोरटा नाजीबूल औलदअली शेख याला पुणे येथे जाऊन अटक केली. गुजरी येथील सराफ व्यावसायिक शैदुल शेख यांचे एसआरएस बैंगल नावाचे सोन्याचे दागिने बनविण्याचे दुकान आहे.त्यांच्या दुकानात काही बंगाली कारागीर कामास आहेत.त्यातील नाजीबूल औलदअली शेख या कारागीराने (दि.14 एप्रिल ) रोजी 20 तोळे सोन्याच्या दागिन्याची चोरी करुन पसार झाला होता.याची फिर्याद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिल्याने त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना हा चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या .
वरिष्ठांच्या दिलेल्या सुचने प्रमाणे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तपास पथक तयार करून सदरचा चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास करीत असताना या पथकातील पोलिस अंमलदार परशुराम गुजरे व योगेश गोसावी यांना माहिती मिळाली की ,यातील चोरटा हा पुणे येथे रविवार पेठेत रहात असलेल्या मित्राकडे गेल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार हे तपास पथक तात्काळ पुणे जाऊन आरोपी नाजीबूल शेख (रा.मुळ रा.सितापूर ,ठाणा जांगीपाडा,पश्चिम बंगाल.सध्या रा.राम गल्ली ,शिवाजी मार्केट ,कोल्हापूर) याला ताब्यात घेऊन त्याच्या कडील 18 लाख रुपये किमंतीचे 20 तोळे सोन्याचे दागिने जप्त करून जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा 24 तासात उघडकीस आणून त्याला पुढ़ील तपासासाठी जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत ,अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.धीरजकुमार बच्चू,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे,पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे,पोलिस परशुराम गुजरे,योगेश गोसावी,रोहित मर्दाने,महेंद्र कोरवी,अमित सर्जे,वैभव पाटील,विलास किरुळकर ,सचिन जाधव,अनिकेत मोरे,राजेश राठोड ,गजानन गुरव आणि संतोष बर्गे यांनी केली.