प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रेखा सुनिल पवार (वय 19.रा.एरोली ,मुंबई सध्या रा.यादववाडी ,शिरोली पु.) या प्रेग्ंट असून त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे सोनोग्राफी केली असता पोटातच बाळाचा मृत्यु झाल्याचे दिसून आले तर काही वेळाने रेखा पवार यांची तब्ब्येत खालावल्याने त्यातच रेखा पवार हिचा मृत्यु झाला.हा प्रकार 1 एप्रिल रोजी घडला असून या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
पुलाची शिरोली हे रेखा पवार हिचे माहेर असून तिचे एक वर्षा पूर्वी बागलकोट जिल्हयातील रबकवी येथील तरुणाशी विवाह झाला होता.लग्नानंतर पती सोबत मुंबई येथे रहात होती.रेखा पवार या बाळंतपणासाठी माहेरी आल्या होत्या.
रात्री उशिरा उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.या घटनेने तिच्या नातेवाईकांनी आक्रोश केला.बाळासह मातेचा मृत्यु झाल्यामुळे त्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.