पँथर आर्मी तर्फे समतावादी भारत राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी प्रतिनिधी : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 134 व्यक्ती व संस्थांना  आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने (बापु) यांच्या शुभ हस्ते समतावादी भारत राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनी सभागृहात समतावादी भारत राष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान सोहळा मोठया दिमाखात संपन्न झाला . अध्यक्षस्थानी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष एस आठवले होते .

समाजवादी विचारवंत प्रसाद कुलकर्णी यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुष्टीकोनातील समतावादी भारत व सामाजिक समरसता या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .

 आमदार डॉ अशोकराव माने , पुडलिंकभाऊ जाधव, मोहन मालवणकर , सुधाकर माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले .

  प्राचार्य साताप्पा कांबळे (गडहिंग्लज ) ,ॲड. डॉ.तुषाल शिवशरण (सांगली ) शेतमजूरांचे नेते सुरेश सासने ,पत्रकार नारायण कांबळे , नागेश भाऊ  शेजाळे, रुई गावच्या सरपंच सौ शकिला उस्मानसो कुन्नूर , चंदुर गावच्या सरपंच सौ स्नेहल कांबळे , राजाराम सह साखर कारखान्याचे संचालक अभयकुमार काश्मिरे,सुधाकर माने (चिकोडी )नलिनी शंकर पाटील सौ. पुनम महावीर भंडारी 

सौ. शैलजा मोहन परमणे आदिच्या सह 122 चळवळीतील कार्यकर्त्याचा मानाचा  कोल्हापुरी फेटा ,शाल सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले . यावेळी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे जिल्हा महासचिव नितेश कुमार दिक्षांत  , जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे ,सौ . लता गायकवाड , माधुरी हिरवे , संतोष खरात , भैय्यासाहेब धनवडे , सौ वासंती देवकुळे ,सचिन माने ,नितिन घावट ,समिर विजापुरे ,मुकेश घाटगे यांच्या सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .

स्वागत व प्रास्ताविक पँथर आर्मी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मच्छिंद्र रुईकर यांनी केले तर आभार राष्ट्रीय संघटक  अमोल कुरणे यांनी मानले

Post a Comment

Previous Post Next Post