प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी महापालिकेच्या हद्दीमध्ये सार्वजनिक बांधकाम कडून सांगली रोड परिसरातील रस्ते मजबुतीकरण डांबरीकरण चे काम चालू आहे त्या मजबुतीकरणातून उतरलेला मुरूम खडी इतर मटरेल महापालिकेस कोणतीही माहिती न देता महापालिकेच्या परवानगीशिवाय संबंधित मक्तेदार उचलून नेत आहेत. जेसीबी व डंपरधारक संबंधितांना विचारले असता pwd चे कोल्हापूर रस्त्याला काम चालू आहे तिथे नेत असल्याचे उत्तर मिळाले महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता महापालिकेकडून कोणतेही परवानगी दिलेली नसल्याची सांगितले गेले आहे. तरी संबंधित मक्तेदाराने महापालिकेच्या मालकीचा मुरूम खडी व इतर मटरेल विनापरवाना दिले आहे तरी त्याची चौकशी होऊन योग्य मोजता होऊन त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करण्यात यावी किंवा महापालिकेचा जो सार्वजनिक बांधकाम कडे जो निधी हिस्सा भरणार आहे त्यातून तो वजा करावी.
शासकीय मालमत्ता विनापरवानी विल्हेवाट लावण्याची चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी हि विनंती. केले कार्यवाही बावत आम्हास लेखी कळवावे असे निवेदनात म्हटले आहे.
उमाकांत दाभोळे इचलकरंजी
९४०४८८०५०१