प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : २०२४ मध्ये इयत्ता आठवीसाठी झालेल्या एन.एम. एम.एस. स्पर्धा परीक्षेमध्ये इचलकरंजी महानगरपालिका रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा क्रमांक २७ या प्रशालेच्या एकूण २५ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले,१५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले व १० विद्यार्थ्यांनी सारथी शिष्यवृत्ती प्राप्त केली.गेल्या काही वर्षापासून विविध स्पर्धा परीक्षांमध्ये इचलकरंजी शहरातील सर्वाधिक गुणवत्ता धारक विद्यार्थी असणारी शाळा हा लौकिक यंदाही रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळेने टिकवला आहे. अत्यंत प्रतिकूल आणि गरीब परिस्थिती मधील विद्यार्थ्यांनी वर्षभर अतिशय कष्टाने व तन्मयतेने अभ्यास करून मिळविलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रशालेच्या मुख्याध्यापिका अलका शेलार यांचेसह शाळेचे सर्व मार्गदर्शक शिक्षक यांनी यासाठी वर्षभर विशेष परिश्रम घेतलेले आहेत.
या यशाबद्दल महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त अशोक कुंभार यांच्या हस्ते सदर परिक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करणेत आला.
यावेळी शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी इरफान पटेल, पर्यवेक्षक राजेंद्र घोडके, शिक्षक अजित शेट्टी आदी उपस्थित होते.