जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवरती अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना देहूरोड शहर (शिंदे गट)च्या वतीने जाहीर निषेध व्यक्त.

 देहुरोड शिवसेना शिंदे गट च्या वतीने पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. 



प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे ,:

देहूरोड दि. :- जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ रोजी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार करत अतिरेकींनी पर्यटकांना जात विचारत गोळीबार केले यात २८ निष्पाप लोकांचे जीव गेले याचे पडसाद देशभर उमटले असता आज जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथील हल्ल्याच्या निषेधार्थ देहुरोड शहर शिवसेना शिंदे गट च्या वतीने देहू रोडच्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चौक बँक ऑफ इंडिया येथे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. 

यावेळी मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, जला दो जला दो पाकिस्तान जलो दो, बंद करो बंद करो सिंध का पानी बंद करो, या पाकिस्तानचा करायचं काय खाली डोके वर पाय, असे जोरदार घोषणा देत अख्ख परिसर दणाणून सोडले यावेळी देहूरोड शहर प्रमुख दीपक चौगुले यांनी अतिरिक्यांनी जे हल्ले केले त्यात २८ निष्पाप लोकांचे बळी गेले याला पाकिस्तान जबाबदार असल्याचे राग व्यक्त करत पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या व पाकिस्तानच्या विरोधात भारत सरकारने कठोर पावले उचलावीत पाक ला चांगले धडा शिकवले पाहिजे असे कडक शब्दात जाहीर निषेध व्यक्त केला.

 यावेळी शिवसेना शहर प्रमुख दीपक चौगुले, कार्याध्यक्ष संदीप बहोत, युवासेना शहर प्रमुख संदीप डुलगज ,संघटक सुरेश बागाव,गोविंद ढिलोढ ,सुरज चंडालिया, साहिल डुलगज, रितेश उत्तुरकर, किशोर पवार, जेष्ठ नेते रंगनाथ राजले, जेष्ठ नेते शशिकांत सप्पागुरू, सुमित बहोत, विनोद सोदे, शिवसेना पदाधिकारी शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि महिला आघाडीचे कार्याध्यक्ष शालिनी चौगुले, शर्मिला सारवान ,पूनम बहोत , उपसंघटिका सविता तेलगू आशा बीडलान, प्रभा लवेरा, सायली गायकवाड, वैष्णवी चौगुले,असे शिवसेना पदाधिकारी शिंदे गट आणि महिला आघाडीचे सर्व प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी देहूरोड पोलिस ठाण्याच्या वतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Post a Comment

Previous Post Next Post