- गुरु का लंगर या महाप्रसादाचे लाभ घेण्यासाठी भाविक व नागरिक सहभागी व्हावे :- अध्यक्ष गुरमित सिंग रत्तू .
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
देहुरोड दि. :- देहूरोड गुरुद्वारा श्री गुरु सिंग सभा देहूरोड गुरूद्वारा प्रबंधक यांच्या वतीने ३२६ व्वा खालसा स्थापना दिवस भव्य दिव्य रुपाने साजरा करण्यात येणार आहे रविवार दिनांक ६ एप्रिल रोजी नगर कीर्तन व भव्य दुचाकी खालसा रॅली आणि नगर किर्तनची सुरुवात पुणे येथुन गुरुनानक दरबार पुणे कॅम्प ते बाटा चौक गेट,नाना पेठ शेल,गुरसिंग सभा गणेश पेठ,लाल महाल काॅर्पोरेशन शिवाजी नगर,ससुन रुगणालय शेन गुरु सिंग सभा,जल लाॉन नगर, दशमेश दरबार, यु पी होटेल श्री गुरु सिंग खडकी, मुंबई खडकी जुना दरबार, मुंबई खडकी दरबार गुरू खंडी महामार्ग, पिंपरी मानसरोवर गुरुद्वारा, आकुर्डी येथून शेवटी देहूरोड च्या गुरुसिंग सभा येथे पोहोचेल ,
गुरुद्वारा देहूरोड येथून सायंकाळी ४:३० वाजता रॅलीची देहूरोड येथे सांगता होईल आयोजित नगर कीर्तन सायंकाळी पाच वाजता सुरू होऊन रात्री आठ वाजता याची सांगता गुरुद्वारा गुरूसिंग सभा येथे होईल, नगर कीर्तनची सुरुवात गुरुद्वारा साहेब, येथुन पुणे मुंबई जुन्या महामार्गावरून बाॅबीदा ढाबा ,संतोष स्वीट्स मार्ट, सवाना गार्डन, उपहारगृह , वृंदावन चौक, महात्मा फुले मंडई, सुभाष चौक येथून गुरुद्वारा येथे रॅलीची सांगता होईल, त्यानंतर भव्य गुरु का लंगर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, या सोहळ्यात सर्व भाविक नागरिक यांनी सहभागी व्हावे असे आव्हान देहुरोड गुरुद्वारा कमिटीचे अध्यक्ष गुरमीत सिंग रत्तू , सचिव गुरुचरण सिंग राजू , उपाध्यक्ष परमजीत सिंग चटवाल, खजिनदार महेंद्रसिंग सहोथा, मिकी कोचर, इंद्रपालसिंग रितू यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल आहे.