देहूरोड पोलीस ठाण्याचा वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती साजरी. असेच अखंडपणे एकोपा ठेवून जयंती साजरा करा :- वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे . -
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
देहूरोड दि. :- भारतीय संविधान सन्मान संयोजन समितीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ व्वी जयंती साजरी करण्यात आले देहूरोड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासकीय अधिकारी ॶॅड कैलास पानसरे व भारतीय संविधान सन्मान संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ रामदास ताटे यांनी पुष्पहार अर्पण केले .
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजय असो जब तक सुरज चाॅंद रहेगा बाबासाहेब साहेब का नाम रहेगा महात्मा फुले चा विजय असो सावित्रीमाईचा विजय असो असे जोरदार घोषणाबाजीने सर्व परिसर आनंदमयी करत जयंती साजरी केली. यावेळी भारतीय संविधान सन्मान समिती च्या सर्व पदाधिकारी समन्वयक यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्या समोर मेणबत्ती प्रज्वलन केले यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मनोनित अधिकारी अॅड कैलास पानसरे यांनी उपस्थित लोकांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देत म्हणाले आज संपूर्ण देशात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरा होत आहे आणी आपण देहुरोडच्या ऐतिहासिक भुमी मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत हे सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे यापुढेही असेच जयंती साजरी होत राहावे असे उपस्थितांना शुभेच्छा दिल्या .
भारतीय संविधान सन्मान समिती च्या वतीने अध्यक्ष डॉ रामदास ताटे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले आज आपण समितीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती मुख्य अतिथी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मनोनित अधिकारी अॅड कैलास पानसरे यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करत आहोत तसेच जयंतीच्या निमित्ताने ५ किलो लाडु वाटप करण्यात येत आहे तसेच उद्या ११:०० वाजता चिंचोली शाळेत शाळेय विद्यार्थ्यांना वही पेन देखील वाटप करणार आहे आणी ते उद्या सकाळी चिंचोली शाळेत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासकीय अधिकारी ॶॅड कैलास पानसरे यांच्या हस्ते हे वही पेन चे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच येत्या दोन दिवसांत देहूरोड पोलीस ठाण्या मध्ये मोफत नेत्र चिकित्सा शिबीर व मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम समितीच्या वतीने करण्यात येणार असल्याचे सांगितले, यावेळी समितीच्या वतीने उपस्थित लोकांना लाडू वाटप करण्यात आले आणी सर्वानी एकामेकाला जयंतीची शुभेच्छा देत एकामेकाला लाडू भरविले यावेळी भारतीय संविधान सन्मान समिती चे मुख्य समन्वयक अशोक कांबळे सहसचिव परशुराम दोडमणी समन्वयक संजय आगळे समन्वयक मोझेस दास सहसचिव चंद्रशेखर पात्रे सदस्य शिवा आरवंटी अजंनी तेलगू लक्ष्मण चुक्का रामस्वामी राजले सायबु तेलगू सोलोमन जोसेफ पिंपल्स रिपब्लिकन पक्षाचे निगडी विभागाच्या महिला अध्यक्षा पायल साळवी यलप्पा सालोडगे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक रघुवीर शैलार, भाजपाचे ज्येष्ठ नेते आशिष शेलार, युवा नेते सुर्यकांत सुर्वे, गुरूद्वारा ट्रस्टचे अध्यक्ष गुरूमितसिंग रत्तू, कुकी रत्तू, जेष्ठ नेते हिरामण साळुंखे, आनंद साळवी आदि उपस्थित होते. तदनंतर देहूरोड पोलीस ठाण्यात देहूरोड पोलीसांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आले पोलीस ठाण्याचा पटांगणात महिला पोलीस कर्मचारी शिपाई यांनी सुंदर रांगोळी काढली होती त्या रांगोळी मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे १३४ वी जयंतीच्या शुभेच्छा दिले होते. प्रारंभी देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर भाजपाचे देहूरोड शहर अध्यक्ष लहु (मामा) शैलार यांनी दिप प्रज्वलन करून अभिवादन केले यावेळी देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी उपस्थित सर्वांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देत म्हणाले आज या पोलीस ठाण्यात माझे हस्ते पहिल्यांदा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा करण्याचा सौभाग्य प्राप्त झाले आहे आणि खुप मोठ्या संख्येने आपण सर्व जण विविध सामाजिक शैक्षणिक राजकीय सामाजिक संस्था संघटनेतील मान्यवर उपस्थित आहेत हे बघून मला खुपचं आनंद होत आहे पुढे असेच ऐक्य ठेवा सर्वांनी मिळून जयंती साजरी करा असे शुभेच्छा दिल्या, यावेळी धर्मपाल तंतरपाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले आज देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत आहे तसेच सर्व पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत जयंती साजरी होत आहे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर ही बहुसंख्येने उपस्थित आहे सर्वांनी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या, भारतीय संविधान सन्मान समिती च्या वतीने अध्यक्ष डॉ रामदास ताटे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले आज देहूरोड पोलीस ठाण्यात अनेक अधिकारी रूजू होऊन गेले पण देहूरोड चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांची ख्यातीच निराळी आहे सर्व विविध सामाजिक क्षेत्रातील लोकांना पोलीस ठाण्यात निमंत्रित करून सर्वान सोबत बनसोडे साहेब जयंती साजरा करत आहेत हे आनंदाची गोष्ट आहे असे अधिकारी आपल्याला लाभले आहेत हे आमचे भाग्य आहे आज १३४ वी जयंती च्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या, यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते श्रीमंत शिवशरण यांनी बुद्ध वंदना घेतली व त्रिशरण घेत जयंतीच्या शुभेच्छा दिल्या ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशन च्या वतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४वी जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या देहूरोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखा विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक लखन कुमार वाव्हळे हे प्रतिवर्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तांने त्यांचा स्वखर्चाने भोजन दानाची परंपरा निभावत आहेत आज ही त्यानी २०० लोकांचें भोजनाची व्यवस्था करून सर्वांना भोजन दान करून जयंती साजरा केली यावेळी भारतीय संविधान सन्मान समिती चे समन्वयक श्रीमंत शिवशरण, मोझेस दास, खजिनदार विजय पवार सह खजिनदार बाबु हिरमेठकर, समन्वयक बाबु टेक्केल, समन्वयक तनवीर मुजावर, सह सचिव चंद्रशेखर पात्रे, समन्वयक प्रभाकर निकम, समन्वयक जावेद भाई शेख,सदस्य चंद्रकांत अनागोंदी सदस्य शंकर तल्लारी सदस्य गफूरभाई शेख सर्व समन्वयक पदाधिकारी उपस्थित होते.