पहलगाम हल्ल्याचा निषेधार्थ पाकिस्तान मुर्दाबाद हिंदुस्थान जिंदाबाद म्हणत जाहीर निषेध व्यक्त.
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
देहूरोड दि. :- पाकिस्तान वर संताप व्यक्त करत फुले शाहू आंबेडकर विचार मंच विकास नगर रिक्षा स्टॅन्ड आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 निष्पाप पर्यटकांना जीव मारल्याच्या निषेधार्थ विकास नगर येथे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी फुले शाहू आंबेडकर विचार मंच चे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनी पाकिस्तानवर जहरी टीका करत पाकिस्तानवर कविता सादर करून चांगलेच समाचार घेतलें .
"मुॅंह के बल गिरोगे, सुन लो ऐ पाकिस्तान वालो, घुटनो पर तुमको लाऐगे सुन लो ऐ पाकिस्तान वालो, हम नही मिटेगे सुनलो ऐ पाकिस्तान वालो, तुमको ही मिटा देगे सुन लो ऐ पाकिस्तान वालो, अल्लाह ने नही सिखाया बेगुनाहों का खुन करना, कुरान मे लिखा है बेगुनाह को माफ करना, तुम कौन-सा कुरान पढ़ते हो ऐ पाकिस्तान वालो"अशी जहरी टीका करत कविता पाकिस्तान वर केले.
यावेळी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आले यावेळी जेष्ठ नेते गफुरभाई शेख जेष्ठ नागरिक संघ चे नानासाहेब डोईफोडे, गोपाळराव तंतरपाळे यांनी ही पहलगाम हल्ल्याचा जोरदार घोषणाबाजी करत जाहीर निषेध व्यक्त केला यावेळी महिला कार्यकर्त्यां सुनीता चांदणे शिवसेनेचे शहरप्रमुख निलेश तरस मोहन राऊत संदीप जांभुळकर बापुसाहेब गायकवाड आदि उपस्थित होते.