प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
देहूरोड दि. :- आंध्र प्रदेश राजमंड्री येथे ख्रिश्चन धर्म गुरु फादर प्रवीण पगडाला यांची काही समाज कंठकानी दिनांक २५ मार्च रोजी निघृणपणे हत्या केली होती या हत्येचा निषेधार्थ देहूरोडच्या वतीने सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी व न्याय मिळविण्यासाठी द अलायन्स चर्च, फास्टर फेलोशिप आणि ख्रिश्चन समाज यांच्या संयुक्त विद्यमाने देहूरोडच्या तलाठी कार्यालय वर संतप्त शांती मोर्चा काढण्यात आला.
देहूरोड तलाठी कार्यालयावर काढण्यात आलेला शांती मोर्चा मध्ये देहूरोड अलायन्स चर्च पासून पास्टर डॉ सोलोमन भंडारी रेव्ह विल्सन पाटोळे कॉम्रेड ब्रदर राजन नायर, महेश दादा बेंजामिन, यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ख्रिस्त बांधव यांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करत शांती आंदोलन करण्यात आले, धर्मातंराचे खोटे आरोप बंद करा, भारतीय ख्रिस्तांना न्याय द्या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या संघटना बंद करा,संविधानात्मक जीवन जगण्याचा नागरिकांना अधिकार द्या,पालक व चर्चवर हल्ला त्वरित बंद करा असे वेगवेगळ्या पोस्टर हातात घेऊन हा मोर्चा मुंबई पुणे महामार्गा वरून पारशी चाळ ,अबुकर शेठ मार्गावरून देहूरोड तलाठी कार्यालयावर मोर्चा येऊन धडकला यावेळी डॉ सोलोमन राज भंडारी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले प्रवीण पगड यांचे अपघात नसून त्यांची निघृणपणे हत्या करण्यात आली आहे यांची सखोल चौकशी सीबीआय च्या मार्फत करण्यात यावी तसेच याची न्यायालियन चौकशी झाली पाहिजे हत्या केलेल्या हरामखोरांना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच अजय बाबु याला पोलीसांनी कुणाला ही न सांगता अटक केले तसेच त्याचा परिवाराला ही या बाबत काहीच कळविले नाही न्यायालयात खटला दाखल झाले तेव्हा पोलीसांनी अजय बाबु हा पोलीसांच्या ताब्यात आहे असे सांगितले तेव्हा न्यायालयाने अजय बाबु याला कशाला अटक केले याचा पोलीसांनी खुलासा करावा असे म्हणत पोलीसांची चांगलीच खरडपट्टी केली या मुळे या देशात ख्रिस्त बांधव हे सुरक्षित नाही अशी संतप्त भावना व्यक्त केल्या, यावेळी देहूरोड किवळे रावेत विभागाचे ग्राम अधिकारी रवी मोहरत यांना फादर प्रवीण पगडाला यांच्या हत्येच्या निषेध व्यक्त करून भारताचे पंतप्रधान,देशाचे गृहमंत्री भारताचे राष्ट्रपती महामहीन द्रौपदी मुर्मू यांना शासनाकडून पाठविण्यासाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी संतप्त व्यक्त करताना सोलोमनरास भंडारी रवी पाटोळे, रेव राजेंद्र कदम, ब्रदर राजेंद्र नायर यांनी फादर प्रवीण पकडचा अपघात मृत्यू नसून त्यांची हत्या केली गेली आहे याची सखोल चौकशी सीबीआय व न्यायालयीन मार्फत चौकशी करण्यात यावी ज्यांनी हे हत्या घडवून आणले व केले आहे त्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच निवृत्त न्यायाधीश यांची समिती गठंन करून चौकशी करण्यात यावी अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वांच्या वतीने व्यक्त करण्यात आले. या मोर्चा मध्ये पास्टर शिंदे पास्टर अजय फिलीप,पास्टर जेहरुम मणीकम, पास्टर सॉलोमन पवार, पास्टर राजन नायर या सर्वानी संतप्त भावना व्यक्त केल्या यावेळी देहूरोड मधील ख्रिस्ती बांधव व महिला बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता व यावेळी निवेदन पोलीसांना ही देण्यात आले.