युवासेना देहुरोड शहर नाम फलकांचे सचिव विश्वजीत बारणे यांच्या हस्ते उद्घाटन .

 सर्वानी एकसंघाने काम करा लोकांचे अडीअडचणी पक्षाच्या माध्यमातून सोडवा सचिव विश्वजीत बारणे.       




प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे

 देहुरोड . :- युवासेना झंझावत युवा शक्तीचा युवा विजय महाराष्ट्र दौरा कार्यक्रमा दरम्यान युवासेना देहुरोड शहर नाम फलकाचे  उदघाटन युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव विश्वजीत बारणे यांच्या हस्ते नाम फलकाचे उद्घाटन करण्यात आले .

यावेळी युवासेना युवका सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव विश्वजीत बारणे यांनी आज देहूरोड शहरात युवासेनेचे फलक उद्घाटन करत आहेत आता शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने युवक युवकांनी एकसंघाने काम केले पाहिजे शासकीय योजनेतुन लोकांचे अडी अडचणी आणी समाज माध्यमातून व पक्ष माध्यमातून करून पक्ष आणखी बळकट केले पाहिजे असे फलक उद्घाटन च्यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले. अशी माहिती देहूरोड शहर प्रमुख दिपक चौगुले यांनी द प्रेस मीडीया लाईव्ह वृत वाहीनीला माहीती देताना दिली. 

यावेळी राज्याचे सदस्य मा. सचिन बांगर, मा.कौस्तुभ. कुलकर्णी, मा राजेंन्द्र तरस युवा सेना पुणे जिल्हा प्रमुख, मा.सागर पाचरणे युवा सेना पुणे जिल्हा समन्वयक, मा माऊली जगताप युवा सेना पिंपरी चिंचवड शहर प्रमुख, मा. विशाल हुलावळे कार्यक्षम युवा सेना मावळ तालुका प्रमुखांने उपस्थित होते. यावेळी युवा सेना देहुरोड शहर प्रमुख संदीप डुलगज यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला. सुमित बहोत, सुरेश बागाव, साहिल डुलगज, गोविंद ढिलोड, प्रथमेश बागाव, ओमकार चौगुले, रोहन ढिलोड,सोनू भुंम्बक, आकाश डुलगज,वीर डुलगज उपस्थित होते.   यावेळी शहर व महिला आघाडी चे पदाधिकारीसह  शहर प्रमुख दिपक चौगुले, कार्याध्यक्ष संदीप बहोत, उपशहरप्रमुख विनोद सौदे, उपशहरसंघटिका शालीनी चौगुले उपशहर, समाज सेविका वैशाली बागाव,  आशा जाधव, प्रभा लव्हेरा आदि पदाधिकार शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post