प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- शेअर मार्केट मध्ये गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणी करवीर पोलिसांनी सागर मारुती माने आणि स्नेहल सागर माने (दोघे रा.सादगी बंगला ,कारदगे हिल्स,जिवबा नाना पार्क ,कोल्हापूर) या पती पत्नीवर दि.31 मार्च रोजी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याची फिर्याद सुनिल मनोहर आंबेकर (वय 54.रा.महालक्ष्मी पार्क,रिंगरोड फुलेवाडी) यांनी दिली.हा प्रकार जानेवारी 2022 ते 16/03/2023 या कालावधीत घडला होता.
अधिक माहिती अशी की,सागर माने आणि स्नेहल माने यांनी संगनमत करुन फॉरेक्स शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवलेल्या रक्क्मेवर दरमहा 10% व दरमहा 15% जादा परतावा देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखवून फिर्यादी 1)सुनिल मनोहर आंबेकर यांची 29 लाख 80 हजार पाचशे.2)श्रीमती संपूर्णा चंद्रकांत बेलेकर यांची 25 लाख 27 हजार,3) संदेश चंद्रकांत बेलेकर यांची 90 हजार,4) रविंद्र कृष्णा माळगे यांची 9 लाख रुपये.5) सुनिल मुंकुंद मोरे यांची 5 लाख 86 हजार रुपये,6) राहुल आनंदराव भोसले यांची 16 लाख 61 हजार पाचशे आणि 7) संजय सदाशिव चव्हाण यांची 13 लाख 20 हजार रुपये अशी एकूण एक कोटी 65 हजाराची फसवणूक करून सौ व श्री माने यांनी स्वतःची असलेली सादगी सेल्स आणि सर्व्हिस इंन्वेस्टमेंट या फर्म मध्ये गुंतवणूक करुन घेऊन ती रक्कम फिर्यादीला आणि गुंतवणूकदारांना परत न देता विश्वासघात करून फसवणूक केल्याने फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन करवीर पोलिसांनी सौ व श्री .माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याचा पुढ़ील तपास करवीर पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे हे करीत आहेत.