पाच हजार रुपये लाच घेताना लोकसेवक परमेश्वर सवाईराम जाधव ग्रामपंचायत अधिकारी रायगड पेन मळेघर, यांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले

 

प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील

सापळा अधिकारी- पोलीस  निरीक्षक अरुंधती जयेश येळवे, ला.प्र. वि. नवी मुंबई. यशस्वी सापळा कारवाई बाबत*युनिट - नवी मुंबई तक्रारदार- पुरुष वय ३२ वर्ष आरोपी लोकसेवकपरमेश्वर सवाईराम जाधव वय-४८ वर्ष, ग्राम पंचायत अधिकारी , नेमणूक - मळेघर, ता. पेण, जि. रायगड. (वर्ग-३)

तक्रार प्राप्त दिनांक - 10/04/2025

*लाचेची मागणी* दि.10/04/2025

 *पडताळणी* दि. 11/04/2025

*सापळा   दिनांक* दि.11/04/2025

  लाचेची मागणी रक्कम तक्रारीनुसार*

  5,000/-रुपये 

लाच स्वीकृती व हस्तगत रक्कम* 

 5,000/- रुपये

लाचेचे कारण.... 

 तक्रारदार हे वकिल असून त्यांचे आशिल यांना कोर्टाचे कामकाजासाठी तसेच एम एस इ. बी. येथे सादर करण्यासाठी त्यांचे वडगाव तालुका पेण, जिल्हा रायगड येथील घराचा असेसमेंट उतारा आवश्यक असल्याने तो मिळण्याकरिता तक्रारदार यांचे अशील यांनी ग्रामपंचायत अधिकारी, मळेघर ,पेन ,जिल्हा रायगड यांचे कडे  दिनांक 17/03/2025     रोजी अर्ज केला होता. परंतु तक्रारदार यांचे अशील हे वयोवृद्ध असल्याने त्यांनी सदर असेसमेंट कागदपत्र प्राप्त करण्यासाठी तक्रारदार यांचे नावे दिनांक10/04/2025 रोजी कुलमुक्त्यार पत्र तयार करून दिले होते.  

त्याअनुषंगाने तक्रारदार यांनी लोकसेवक यांना दिनांक 10/04/2025 रोजी फोनवरून संपर्क करून नमूद कामा बाबत विचारणा केली असता लोकसेवक यांनी सदर कामाकरिता तक्रारदार यांचे कडे रुपये पाच हजार रकमेची मागणी केली. तक्रारदार याना लाच देण्याची इच्छा नसल्याने  त्यांनी दिनांक 10/04/2025 रोजी नवी मुंबई,ला.प्र.विभाग येथे येऊन तक्रार दिली.

        प्राप्त तक्रारीनुसार दिनांक 11/04/2025 रोजी शासकीय पंचा समक्ष पडताळणी करण्यात आली असता आरोपी लोकसेवक  परमेश्वर सवाईराम जाधव यांनी रुपये 5000/ लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

        त्याप्रमाणे लागलीच करण्यात आलेल्या सापळा कारवाईदरम्यान नमूद आरोपी लोकसेवक यांनी 5000/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारले नंतर रंगेहात पकडण्यात आले असून भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारित२०१८) कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची पुढील कार्यवाही पेण पोलिस ठाणे, पेण, जिल्हा रायगड येथे सुरू आहे. 

 सापळा अधिकारी-* पोलीस  निरीक्षक अरुंधती जयेश येळवे, ला.प्र. वि. नवी मुंबई.

 सापळा पथक*  

पो. नि.संतोष पाटील,

स. पो. उपनिरीक्षक जाधव,

 म.पो. ना. बासरे , पो.शि. चौलकर 


पर्यवेक्षण अधिकारी*

मा. श्री नितीन दळवी ,

पोलीस उपअधीक्षक नवी मुंबई ला. प्र. विभाग 

 **मार्गदर्शन अधिकारी* 

**मा.श्री. शिवराज पाटील सो ,* 

 पोलिस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र

*मा.श्री.संजय गोविलकर सो,* अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र. 

*मा.सुहास शिंदे सो,*

अप्पर पोलीस अधीक्षक 

एसीबी ठाणे परिक्षेत्र* 

*नवी मुंबई, रायगड,ठाणे येथील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*

 *टोल फ्रि क्रं. १०६४ 

दूरध्वनी क्रमांक 02141-222331

Post a Comment

Previous Post Next Post