प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने केबल आणि मोटारसायकल चोरटा विजय मधुकर गुरव (वय 32.रा.शिरगांव ,ता.शाहुवाडी ) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्यांच्या कडुन 3 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून केबल चोरीचे 2 आणि मोटारसायकल चोरीचे 2 असे एकूण 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना कोल्हापूर जिल्ह्यात शेतातील होत असलेल्या केबलची चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.
वरिष्ठांनी दिलेल्या आदेशा नूसार पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहा.पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचे तपास पथक नेमले.सदर तपास पथकाने कोल्हापूर जिल्ह्यात घडलेल्या शेतातील केबल चोरीच्या गुन्हयांची माहिती घेऊन त्यांची ठिकाणे,वेळ आणि चोरी करण्याची पद्धत याचा अंदाज घेऊन तपास करीत असताना या तपास पथकातील पोलिस अंमलदार हिंदुराव केसरे ,सोमराज पाटील आणि विजय पिंगळे यांना माहिती मिळाली की, कोडोली पोलिस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा हा शाहुवाडी तालुक्यातील शिरगांव येथील विजय गुरव आणि त्याच्या साथीदाराने केला असून तो आज कोडोली येथील काखे फाटा येथे टाटा कंपनीची नॅनो (गाडी क्र.एमएच -02-बिटी-0870) कार मधून चोरलेली केबल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकाने दि.04 एप्रिल 25 रोजी कोडोली येथील काखे फाटा येथे जाऊन सापळा लावून विजय गुरव आणि एका अल्पवयीन मुलाला नॅनो गाडी व मोटारसायकलसह ताब्यात घेतले.त्या नॅनो गाडीत एका गोणपाटात गुंडाळलेली 800 शे फुट लांबीची काळ्या रंगाची केबल असा एकूण 3 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल मिळून आला.
या बाबत त्या दोघांच्याकडे मुद्देमाला बाबत चौकशी केली असता त्यांनी 2 केबल आणि 2 मोटारसायकल चोरी असे चोरीचे चार गुन्हयांची कबुली दिली.आरोपी विजय गुरव याला पुढ़ील तपासासाठी कोडोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
आरोपी विजय गुरव आणि अल्पवयीन मुलावर चोरीचे शाहुवाडी येथे 2 ,कोडोली व हातकंणगले येथे प्रत्येकी 1 असे एकूण 4 गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल होते ते उघडकीस आणले.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव,पोलिस हिंदुराव केसरे,सोमराज पाटील ,विजय पिंगळे,संजय पडवळ,राम कोळी,अरविंद पाटील,रोहित मर्दाने,हंबीरराव अतिग्रे आणि विनोद कांबळे यांनी केली.