प्रेस मीडिया लाईव्ह :
अतिग्रे प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे तालुका हातकणंगले येथील जिल्हा परिषद विद्या मंदिर अतिग्रे या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण घेतले जाते त्या शाळेमध्ये तारदाळ येथे असणाऱ्या आयबेन स्टॉक पॉझीटाॅॄन इलेक्ट्रि वर्क या कंपनीने या जिल्हा परिषद शाळेमध्ये कंपनी मार्फत असणारा सीएसआर फंड मंजूर करून या शाळेसाठी दोन वर्गाला आतून व बाहेरून रंगरंगोटी, बोलक्या भिंती, तसेच लोखंडी गेट, पाच खोल्यांचा व्हरांडा भिंतीची रंगरंगोटी व बोलक्या भिंती, आणि पाच लोखंडी तिजोरी इत्यादी सुविधा देण्यात आल्या, खास करून या उपक्रमास कंपनीचे जनरल मॅनेजर माननीय किशोर निकम साहेब, असिस्टंट जनरल मॅनेजर माननीय महादेव गायकवाड साहेब, आयटी मॅनेजर माननीय विशाल मुगडे साहेब यांच्या पुढाकाराने व सहकार्याने तसेच अतिग्रे गावातील याच जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी व सध्या या कंपनीमध्ये ऑपरेटर चे काम करणारे अमित भंडारे, अक्षय गुरव, शुभम गुरव, यांचे सहकार्य लाभले तसेच या शाळेमध्ये सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षिका सौ वंदना पाटील मॅडम व त्यांचे पती माझी केंद्रप्रमुख पाटील सर यांचे सहकार्य लाभले
या कार्यक्रमाच्या सत्कार समारंभ वेळी प्रथमता सर्व पाहुण्यांचे शालेय विद्यार्थ्यांनी वाजत गाजत स्वागत केले व स्वागत श्री कोठावळे सर यांनी केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक सो परीट मॅडम यांनी केले सर्व आलेल्या पाहुण्यांचे सत्कार पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी केले, यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली व असेच या शाळेसाठी आमच्या कंपनीमार्फत इथून पुढे मदत करण्यात येईल असे सांगण्यात आले
यावेळी या कार्यक्रमास उपस्थित लोकनियुक्त सरपंच माननीय श्री सुशांत वडृ, उपसरपंच श्री भगवान पाटील, सदस्य बाबासो पाटील, राजेंद्र कांबळे, नितीन पाटील, अनिरुद्ध कांबळे, सदस्या अक्काताई शिंदे,कलावती गुरव, छाया पाटील,दिपाली पाटील, कल्पना पाटील ,वर्षा बिडकर , ग्रामविकास अधिकारी श्री बाबासाहेब कापसे, पोलीस पाटील सौ रूपाली पाटील,रुकडी केंद्रप्रमुख श्री शशिकांत पाटील सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ वैशाली पाटील, उपाध्यक्ष सौ प्रांजल सूर्यवंशी, व सर्व सदस्य, या शाळेसाठी रंगरंगोटी करणारे पेंटर महेश कांबळे, पत्रकार भरत शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक श्री राजकुमार भोसले, शिक्षक राजाराम कोठावळे ,तुकाराम माने, अमोल गायकवाड, वंदना पाटील, रोहिणी बडे, सरिता रानगे ,पूनम परीट, व सर्व विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते
शेवटी आभार श्री भोसले सर यांनी मांडले