मोटारसायकलने दिलेल्या धडकेत वृध्द ठार.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- संगमेश्वर तालुक्यातील मुरदपूर येथील आत्माराम भागोजी गोंधळी (वय 62) या वृध्दाचा सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

आत्माराम गोंधळी मुंबई येथे साडी कारागीर असून ते  एका साडी तयार होत असलेल्या कंपनीत नोकरी करीत होते.ते आजारी असल्याने आपल्या गावी आले होते.मंगळवार (दि.22) रोजी आठच्या सुमारास चालत जात असताना समोरुन येत असलेल्या मोटारसायकलने धडक दिल्याने जखमी झाले होते.जखमीला उपचारासाठी रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.तेथे उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले तेथे उपचार चालू असताना आज त्यांचा मृत्यु झाला.

Post a Comment

Previous Post Next Post