प्रेस मीडिया लाईव्ह ;
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- करवीर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कौतुकास्पद कामगिरी करुन 7 लाख रुपये किमंतीच्या 18 मोटारसायकली जप्त करून एका अल्पवयीन मुलासह पाच जणांना अटक केली आहे.या मध्ये संकेत संदिप गायकवाड (वय 19)आदित्य प्रकाश पाटील (20) सौरभ धनाजी पाटील (वय 22) सुमित धनाजी माळी (वय 21.चौघे रा.मौजे सांगाव ,ता.कागल) आणि यश प्रकाश जाधव (वय 22.रा.क.सांगाव ,ता.कागल ) यांचा अटक केलेल्यात समावेश आहे.
यातील फिर्यादी रितेश नामदेव कोळी (रा.चिंचवाड ,ता.करवीर ) हे दि.19 फ़ेब्रु.2025 रोजी आपल्या यामाहा मोटारसायकल वरुन शिवजयंती निमित्त ज्योत आणण्यासाठी पन्हाळा येथे जात होते.त्यांनी आपली मोटारसायकल केर्ली येथे लावून ज्योत आणण्यासाठी पन्हाळा येथे चालत गेले होते.परत आल्यानंतर यामाहा मोटारसायकल मिळून न आल्याने त्यांनी मोटारसायकल चोरीची फिर्याद करवीर पोलिस ठाण्यात दिली होती.सदर गुन्हयांचा तपास करीत असताना दि.19 मार्च रोजी माहिती मिळाली की ,मौजे सांगाव येथील संकेत गायकवाड हा आपल्या मित्रा समवेत चोरीतील मोटारसायकल विक्री करण्यासाठी मोरेवाडी परिसरात असलेल्या चित्रनगरी येथे माळावर येणार असल्याची माहिती मिळाली.याची माहिती करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांना देऊन पोसई गळवे आणि गुन्हे शोध पथकातील पोलिसांनी त्या परिसरात सापळा रचून पाच आरोपींच्याकडे असलेल्या विना नंबर प्लेटच्या मोटारसायकली या बाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने गाडीच्या कागदपत्राची चौकशी असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले .त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदरच्या मोटारसायकली चोरीच्या असल्याचे सांगितले.त्यांच्या कडील असलेल्या मोटारसायकली या केर्ली फाटा,शाहुमिल ,कोल्हापूर व इंचलकरंजी येथील आमराई मळा येथून चोरल्याचे सांगून त्यांच्यावर करवीर ,राजारामपुरी आणि इंचलकरंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली.यातील KTM Duck 200 ही मोटारसायकल सुमित माळी व यातील अल्पवयीन मुलाने चोरी केल्याने आरोपी सुमित माळी याला इंचलकरंजी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.त्याच प्रमाणे 1 ते 4 आरोपीना अटक करून त्यांच्या अधिक तपास केला असता 12 मोटारसायकली मिळून आल्याने त्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.या आरोपी कडुन राजारामपुरी,शिवाजीनगर, राधानगरी,इंचलकरंजी आणि इस्पुर्ली पोलिस ठाण्यात दाखल असलेले चोरीचे गुन्हे उघडकीस आले.यातील आरोपी एकमेकाचे मित्र असून ते एकाच गावातील आहेत.आणि त्यांचा यामाहा रेसिंग क्लब नावाचा ग्रुप आहे.या आरोपींना रेसिंगची आवड असून त्यानी हौसेखातीर चोरी केल्या आहेत.यातील चौघांना एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे.
यातील आरोपीनी आणखी मोटारसायकली चोरल्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने तपास चालू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत,अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.धीरजकुमार बच्चू ,उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर शिंदे,सपोनि.बाबासाहेब सरवदे,
पोसई नाथा गळवे,विजय तळसकर,श्रीधर जाधव,विजय पाटील,रणजित पाटील,सुजित दावणे,पोहेकॉ प्रकाश कांबळे,अमोल चव्हाण ,योगेश शिंदे,चालक रणजित देसाई,मुरलीधर लांघी यांनी केली.