वर्धापनदिनानिमित्त यापुढे लोकांना दहा टक्के सवलत देणार......
संचालक रमेश केसप्पागारी.
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
देहूरोड दि. देहूरोड येथील रमेश केसाप्पागारी यांनी सामाजिक कार्या बरोबर शहराच्या सर्व सामान्यांच्या भागात औषध विक्रीच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्याचे सेवा करीत आहेत त्या सेवेला आज गुढीपाडवाच्या दिनानिमित्त पाचवा वर्धापन दिन साजरा करीत आहे यापुढेही अशीच प्रगती करत आरोग्यसेवा सदोदित राहू द्या असे देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष ॳॅड. प्रवीण झेंडे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गावर रमेश गोविंदाप्पा केशाप्पागारी यांनी समाजसेवा करीत औषध विक्रीचे केंद्र सुरू करून आरोग्य सेवा सुरू केले त्या सेवे उपक्रमाला आज गुढीपाडव्याच्या दिनी आयोजित पाचवा वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देताना ॶॅड. प्रवीण झेंडे बोलत होते यावेळी माला समाजाचे जेष्ठ नेते शंकर तल्लारी यांनी श्री मेडिकल चे संचालक रमेश हे मागील पाच वर्षांपासून औषध विक्रीचे सेवा देत आहेत अनेक गोर गरीब या औषधालयातुन औषध घेऊन जात आहे कधी कधी अपुरे पैसे असल्यास रमेश हे सवलत देत औषध देत असतात यापुढेही असेच त्यांनी सेवा देत राहो अशी अपेक्षा व्यक्त केली भारतीय संविधान सन्मान समिती चे समन्वयक परशुराम दोडमणी यांनी श्री मेडिकल चे संचालक रमेश यांचे कौतुक करून म्हणाले मागील पाच वर्षांपासून आम्ही येथे औषध घेत आहेत अनेक लोकांना अल्पदरात रमेश हे सवलत देऊन लोकांची सेवा करीत आहेत यापुढे असेच गरीबांना मदत करत राहावे असे मनोगत व्यक्त केले. प्रारंभी फीत कापून अॅड प्रवीण झेंडे यांनी कार्यक्रमाचा शुभारंभ केला तर मानव आधार सामाजिक संघ चे राज्य उपाध्यक्ष बाबु हिरमेठकर यांनी श्रीफळ फोडून शुभारंभ केला. यावेळी श्री मेडिकलचे संचालक रमेश केसप्पागारी व मानव आधार सामाजिक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाबू हिरमेटकर यांनी अॅड झेंडे यांच्या शाल श्रीफळ पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मान केला, यावेळी रमेश यांनी श्री मेडिकल औषध विक्री केंद्रात सर्व प्रकारचे औषधे विक्रीची सेवा केली जाते यंदा या सेवेला पाच वर्षे पूर्ण होत असून हा पाचवा वर्धापनदिनी आपल्या सर्वसामान्यांचा उपस्थितीत साजरा करीत आहोत यंदा पाचव्या वर्धापन दिनानिमित्त लोकांना यापुढे औषध विक्रीस दहा टक्के सवलत देणार असल्याचे घोषणा त्यांनी केली. तसेच मोफत घरपोच औषध सेवा उपलब्ध असल्याचे ही जाहीर केले जर कुणाला तातडीने औषध पाहीजे असेल तर 9130056190/ 8149656190 या क्रमांकावर औषध व माहीती मिळेल असे ही संचालक रमेश यांनी सांगितले उपस्थित सर्वानी रमेश यांचा टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
या वर्धापनदिनानिमित्त प्रवीण झेंडे, अॅड कृष्णा दाभोळे बाबू हिरमेटकर, परशुराम दोडमणी, शंकर तल्लारी, गोपाल राव, सुमित गायकवाड, किरण शिरसागर, श्रीरामलू, कृष्णा राजले,मलिकार्जुन, शिंगाटे, विशाल चव्हाण, सुगप्पा कोळी जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशनचे जिल्हा सचिव चंद्रशेखर पात्रे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.