सौगात-ए-मोदी म्हणजे जखमावर मरहम-ए-मोदी

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : पवित्र रमजान ईदनिमित्त भारतातील 32 लाख गरीब मुस्लिमांना भेटवस्तू देण्यासाठी भाजपने सौगात-ए-मोदी कार्यक्रम हाती घेतला आहे. मोदी सरकारचे वतीने रमजान ईद भेट वस्तूमध्ये खाद्यपदार्थ, कपडे, शेवया, ड्रायफ्रूट महिलांच्या किटमध्ये पंजाबी सूट तर पुरुषांच्या किटमध्ये कुर्ता आणि पायजमा वस्तू भेट देण्यात येणार असल्याची माहिती मोदी  सरकारच्या वतीने देण्यात आली.ही किटची साधारण किंमत 500 ते 600 रुपये पर्यंत आहे.

32 लाख मुसलमानांना कीट देणे म्हणजेच सरकारचे 1 अरब 60 कोटी रुपये सौगात-ए-मोदी मुसलमानांना खुश करण्यासाठी  व आगामी निवडणुका डोळ्यासमोर असल्याचे दिसून येते.

सौगात-ए-मोदी या भेटीचा मूलनिवासी मुस्लिम मंचाने विरोध दर्शविले आहे.

देशात मोदी सरकार आल्यानंतर प्रचंड मुस्लिमांवर अन्याय अत्याचार झाला मोबलिंचींगच्या नावाखाली मुस्लिमांची कत्तली झाली. देशात मंदिर मस्जिदच्या नावाखाली हजारो मुसलमाना तुरुंगात टाकले तर काही मुसलमानांच्या घरावर बुलडोझर फिरविण्याचा काम मोदी सरकारने केले आहे. 

मोदी साहेबांचे आमदार आणि खासदार सतत मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखविण्याचे काम करतात. सरकारचे लोक त्यांना शाब्बासकी देतात.

संघ परिवार व्हीएचपी, बजरंग दल व इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून मुस्लिमांचा छळ केला जातो दहशत निर्माण केली जाते. वास्तविक पाहता मोदी सरकारने मुसलमानावर होणाऱ्या अन्याय अत्याचार दहशत थांबविण्याचा काम करावा. असे केले तर हीच खरी मुस्लिमांसाठी सौगात-ए-मोदी ठरेल.

मुस्लिमांचा सौघात करून मुस्लिमांना सौगात-ए-मोदी ईदचा किट फक्त पाचशे रुपयांची भेट देऊन मुस्लिमांच्या जखमावर मरहम लावण्याचे काम मोदी सरकार करू नये.

मोदींची या रमजान कीट बाबत प्रचंड मुस्लिम समाजामध्ये नाराजगी आहे. पुणे बोपोडी या ठिकाणी मूलनिवासी मुस्लिम मंचाचे वतीने सौगात-ए-मोदीचा विरोध करण्यासाठी कार्यकर्ते एकत्रित आले होते. संस्थेचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी मुस्लिम समाजाला आवाहन केली की तुमच्या घरी मोदी सरकारची सौगत-ए-मोदी रमजान किट आली तर त्याला परत करा मुस्लिम समाज स्वाभिमानी आहे हे दाखविण्याचं काम मुस्लिम समाजाने करावा असे आव्हान केले. 

मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते हातात सदरचे फलक घेऊन थांबलेले होते.

सौगात-ए-मोदी

खाद्यपदार्थ, कपडे, शेवया, ड्रायफ्रूट, पहचानने के लिए कपडे.....

 बंद केलेली मौलाना आझाद स्कॉलरशिप पुन्हा सुरू करा हीच मुस्लिमांनासाठी खरी सौगात-ए-मोदी ठरेल.

 धार्मिक तेढ निर्माण करणारे राज्यकर्त्यांचे तोंडाला चिकटपट्टी लावा हीच खरी मुस्लिमांसाठी सौघात-ए-मोदी ठरेल

 मुसलमान समाजाची हक्काचे असलेली वकफ बोर्ड जमिनीवरचा नाजायज ताबा हटाव हीच मुसलमानांसाठी खरी सौगात-ए-मोदी ठरेल

 मुघलांचा इतिहास दाखवून भारतीय मुस्लिमांची छळ थांबवा हीच खरी मोदींची सौगत ठरेल

 चित्रपटाच्या माध्यमातून

खोटा इतिहास दाखवून तरुणांची माती भडकविणे बंद करा 

सौगत-ए-मोदी

 32 लाख मुसलमानांना 1 अरब 60 कोटी रुपये सौगात-ए-मोदी

असे फलक हातात घेऊन मूलनिवासी मुस्लिम मंचाने मोदी सरकारच्या सौगात-ए-मोदींचा व ईद कीटचा विरोध केला याप्रसंगी मोठ्या प्रमाणात मूलनिवासी मुस्लिम मंचाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 


अधिक माहितीसाठी संपर्क करा 

अंजुम इनामदार 

अध्यक्ष मूलनिवासी मुस्लिम मंच पुणे.  9028402814

Post a Comment

Previous Post Next Post