इफ्तार पार्टी मध्ये शहरातील अनेक राजकीय सामाजिक कला क्रिडा शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती .
प्रेस मीडिया लाईव्ह :
चंद्रशेखर पात्रे :
देहूरोड दि. :- देहूरोडच्या जामा मस्जिद येते सर्वधर्म समभावचे दर्शन सामाजिक सलोखा व एकोपा चे दर्शन देहूरोड च्या जामा मस्जिद येते दिसुन आले जामा मस्जिद मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचे जामा मस्जिद कमिटीचे विश्वसनीय सदस्य अनिस शेख यांनी सर्वांचे स्वागत केले .
आलेल्या सर्व पाहुण्यांचे पाहुणचार करत इफ्तार पार्टी साठी मेजवानी साठी भव्य असे टेबल खुर्ची वर आलेल्या पाहुण्यांना फल फ्रुट सॅलड पाण्याचा बाटली आणी ज्युस ची मेजवानी जामा मस्जिद कमिटीच्या वतीने देण्यात आले. आलेल्या सर्व पाहुणे मंडळी ने या इफ्तार पार्टी चे आनंदाने स्वाद घेतले पवित्र रमाजानचा महिना असल्याने शहराचे अनेक सामाजिक संघटना राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा,व पत्रकार बंधु सह सर्व क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते यावेळी देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सर्व प्रथम जामा मस्जिद कमिटीचे कौतुक केले आलेल्या सर्वांचे स्वागत करत म्हणाले मी माझ्या कामाच्या कारकीदेमध्ये आज ३७ वर्ष झाले काम करीत आहे अनेक ठिकाणी पोलीस ठाण्या मध्ये मी काम केले आहे असे सर्व धर्म समभाव असलेले इफ्तार पार्टी मी पहिल्यांदा बघत आहे एवढ्या मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले आहेत मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघून मी आश्चर्यचकित झालो आहे या इफ्तार पार्टीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन देशाला व समाजाला एक नवीन संदेश देत आहेत हे खूप आनंदाची गोष्ट आहे यापुढेही असेच सामाजिक सलोखा देहूरोड शहरा मध्ये राहो नेहमी सामाजिक सलोखा अबाधित राहो असे सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि सर्व मुस्लिम बांधवांना व कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी धन्यवाद मानतो मला आपण येथे आमंत्रित केले असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासकीय अधिकारी ॶॅड. कैलास पानसरे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत म्हणाले देहरोड शहर हे मिनी इंडिया आहे इथे नेहमी जातीय सलोखा जपले जाते हे शहराचे वैशिष्ट्य आहे आज या इफ्तार पार्टीमध्ये सर्वधर्मसमभाव अनेक वर्षांपासून दिसून येत आहे आणि मुस्लिम बांधवांनी आम्हा सर्वांना या इफ्तार पार्टी मध्ये बोलवून आमचे मान सन्मान सर्वांचे स्वागत केले यापुढे असेच कार्यक्रम जमा मस्जिदच्या वतीने राबविण्यात येतील अशीच एकोपा चे दर्शन घडत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो असे पानसरे म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अॅड कृष्णा दाभोळे यांनी आपले मत प्रकट करताना म्हणाले देहुरोड शहर ये सर्व जाती धर्माने नटलेला देहुरोड शहर आहे येथे सर्व जाति जमातीचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहे राज्यात देशात अनेक ठिकाणी जाति पातीवर भांडण तंटे दंगल घडते पण आज पर्यतचा इतिहास आहे देहूरोड शहरात कधीच जातिपातीवर दंगल घडलेले नाही अनेक धर्म पंथाचे लोक येथे राहतात म्हणून देहुरोड शहराला मीनी इंडिया म्हणून संबोधले जाते असे आपले मत प्रकट केले यावेळी मुस्लिम बांधवांना आलेल्या पाहुण्यांनी रमजान च्या शुभेच्छा देत गळाभेट देत एकामेकाला मीठी मारून एकामेकांचे तोंड गोड केले. या इफ्तार पार्टी मध्ये नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वर सेठ अगरवाल, भारतीय संविधान सन्मान समितीचे अध्यक्ष व टी व्ही के नाईनचे संपादक डॉ रामदास ताटे, मुख्य समन्वयक व विशाल संविधान चे सह संपादक अशोक कांबळे समन्वयक व मनसेचे मावळ तालुका उपाध्यक्ष मोझेस दास, ज्येष्ठ नेते समन्वयक विजय पवार, ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशनचे जिल्हा सचिव व प्रेस मीडीया लाईव्ह चे पत्रकार चंद्रशेखर पात्रे, दैनिक प्रभात चे प्रतिनिधी रामकुमार अगरवाल, आवाज टुडे चे प्रतिनिधी इम्रान शेख, प्रेस मीडीया लाईव्ह चे शहर प्रतिनिधी अनवर अली शेख,शिवसेनेचे जेष्ठ नेते रमेश जाधव, गुरूद्वारा ट्रस्टचे अध्यक्ष गुरमितसिंग रत्तू, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते मिक्की कोचर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संतोष म्हस्के, शिवसेनेचे शहरप्रमुख दिपक चौगुले, शाहु फुले आंबेडकर विचारमंच चे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, गोपाळ तंतरपाळे, भाजपाचे नेते सुर्यकांत सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते मलिक शेख, धम्म भुमी सामाजिक संस्थेचे के एच सुर्यवंशी आर टी आय कार्यकर्ते श्रीजीत रमेशन जेष्ठ नेते सागरभाऊ लांगे, सामाजिक कार्यकर्ते शंकर स्वामी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम दोडमणी, आमदार सुनिल शेळके यांचे स्वीयसहायक अतुल मराठे मुस्लिम समाजाचे जेष्ठ नेते गफुरभाई शेख जावेद भाई शकिलकर सामाजिक कार्यकर्ते गौउसभाई शेख असे अनेक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.
Tags
देहूरोड