संघपाल शिरसाट राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्काराने सन्मानित.

 पुरस्काराने सन्मानीत झाल्याने सर्वस्तरा वरून अभिनंदनाचा वर्षाव.

प्रेस मीडिया लाईव्ह :

चंद्रशेखर पात्रे :

अकोला दि. :-  केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्लीतर्फे राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार वितरण सोहळा 15 मार्च रोजी सकाळी दहा वाजता मौजे गोळेगाव तालुका बोदवड जिल्हा जळगाव (पु खान्देश) येथील श्री गजानन महाराज ट्रस्टच्या मंदिर येथे  निसर्गमय परिसरात  उत्साहात संपन्न झाला.

 या कार्यक्रमा मध्ये मानवी सेवेसह संविधान संवर्धनासाठी ज्यांनी मोलाचे योगदान दिले अशा काही मान्यवरांचा पुरस्कार देऊन ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला. यामध्ये राज्यस्तरीय संविधान गौरव पुरस्कार राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मिलिंद दहिवले व राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ विनय कुमार कस्तुरे यांच्या हस्ते देऊन समाजसेवक संघपाल शिरसाठ यांना सन्मानित करण्यात आला आहे संघपाल सिरसाठ हे साप्ताहीक उपेक्षित व-हाड मध्ये आपल्या लेखणीच्या माध्यमातुन गोरगरीबांना न्याय मिळवुन देत आगे तसेच मानव आधार ह्युमन राईटस जस्टिस असोशियन संघटनेच्या वतीने समाज कार्य करून अन्याय अत्याचार विरूद्ध लोकांना न्याय मिळवुन देत आहेत पुरस्काराने सन्मानीत झाल्याने सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे यावेळी कार्यक्रमाला राष्ट्रीय कार्यकारी सचिव डॉ बबनराव महामुने, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष डॉ डीव्ही खरात जळगाव खानदेश जिल्हाध्यक्ष रवींद्र काशिनाथ सोनार मुंबई प्रांताचे कार्यकर्ते जनाब बशीर शेख महाराष्ट्र राज्य पदाधिकारी डॉ पंकज इंगळे डॉ अमोल कुमार तायडे आधी प्रमुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post