देहूरोड पोलीसांची धडाकेबाज कारवाईत एक पिस्तूल एक जीवंत कारतूस एक लोखंडी कोयता जप्त.

पदभार स्विकारताच धडाकेबाज कारवाई तीनजण ताब्यात त्यात दोन विधी संघर्ष बालकांचा समावेश १ लाख ३१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.                        


प्रेस मीडिया लाईव्ह 

चंद्रशेखर पात्रे :

देहूरोड दि. :-देहूरोड पोलीसांची धडाकेबाज कारवाई देहुगांव येथील दुकानदाराला लुटण्यासाठी तीन जण शस्त्र सहीत येत असल्याचे गुप्त बातमीदाराकडून पोलीस शिपाई प्रशांत माळी यांना मिळाले असता देहुगांव  येथे भैरवनाथ चौकात येथे सापळा रचून शिताफीने तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यात दोन विधी संघर्ष बालकांचा समावेश आहे ही कारवाई दिनांक १८ रोजी रात्री आठच्या सुमारास देहुगांव येथे भैरवनाथ चौक येथे करण्यात आले  माहिती मिळाली असता संशय रीतीने काळोखे चौक येथे येत असलेल्या या तिघांचा पोलीसांनी पाठलाग करून पकडले असता त्यांचे हावभाव वरून त्यांचे बोलण्यावरून ते संशयित वाटलें त्यांची जाडाझडती घेण्यात आली तेव्हा मोटारसायकलच्या डिक्की मध्ये एक ५० हजार रुपये चे एक पिस्टल एक जिवंत कारतुस तर एकाचा कमरेला लोखंडी कोयता आढळून आले तसेच एक पांढऱ्या रंगाची सुझुकी एक्सेस एक बजाज कॅलिबर दुचाकी असे एक लाख एकतीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे अशी माहिती देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत माहीती देताना दिली. विशेष म्हणजे आताच पदभार स्विकारलेले गुन्हे शाखा प्रकटीकरण विभागा मध्ये सहायक पोलिस निरीक्षक जोयफ शेख व उप पोलीस निरीक्षक लखन कुमार वाव्हळे हे पदभार स्विकारताच ही कामगिरी दाखविली आहे यामुळे यांचे नागरिक कौतुक करीत आहेत.                  

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले सहायक पोलीस निरीक्षक उप पोलीस निरीक्षक लखन कुमार वाव्हळे ,पोलीस हवालदार किरण खेडकर, प्रदीप माने, बाळासाहेब विधाते, पोलीस ना. सुरेश ढवळे, पोलीस शिपाई प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडिक, युवराज माने, पंकज भदाणे, मोमीन शेख या पथकाने ही दमदार कारवाई केली आहे या गुन्ह्याच्या अधिक तपास उप पोलीस निरीक्षक लखन कुमार वाव्हळे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post