प्रेस मीडिया लाइव्ह
अन्वरअली शेख
देहूरोड:- मामुर्डी परिसरातील रिक्षा चालक सचिन जोगदंड मामुर्डी भागात रिक्षा चालवत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक मोबाईल पडलेला सापडला, त्यांनी तो मोबाईल उचलला काही वेळ त्या मोबाईल वर कोणाचा तरी कॉल येईल असे त्यांना वाटले, परंतु कोणाचाही कॉल न आल्याने जोगदंड यांनी पुणे खबर वृत्तवाहिनीचे संपादक पत्रकार रजाक शेख यांच्याशी संपर्क साधला, रज्जाक शेख यांनी तो सापडलेला मोबाईल देहूरोड पोलीस ठाण्यात जमा करण्यास सांगितले, सचिन जोगदंड यांनी पोलिस ठाण्यात मोबाईल जमा केल्यानंतर ठाणे अंमलदार यांनी मोबाईल जमा करून घेतला.त्या मोबाईल ची ओळख पटवून मूळ मोबाईल मालकाला देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या हस्ते मोबाईल देण्यात आला. या प्रामाणिक रिक्षा चालकाचा देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे व उपनिरीक्षक लखन कुमार व्हावळे यांनी अभिनंदन केले . मोबाईल मालक वैभव ढाकणे यांना हरवलेला मोबाईल परत मिळाल्याबद्दल मोबाईल बघून खूप आनंद झाला. सचिन जोगदंड यांच्या मुळे मला मोबाईल परत मिळाला, सचिन सारखे प्रामाणिक रिक्षा चालक आजही या जगात आहेत.सचिन सारख्या रिक्षा चालकाचे आभार मानावे तेवढे कमीच असे वैभव ढाकणे म्हणाले.