प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या, पूना कॉलेज ऑफ फार्मसी(एरंडवणे) तर्फे जागतिक महिलादिनानिमित माजी विद्यार्थिनींचा सत्कार दि. १५ मार्च २०२५ रोजी सकाळी पार पडला. या कार्यक्रमासाठी मदर अँड चाईल्ड हेल्थ केअर,ईर्षा संशोधन संस्था(भारती विद्यापीठ) च्या विभाग प्रमुख डॉ.साधना जोशी या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.या कार्यक्रमात पूना कॉलेज ऑफ फार्मसीच्या १९८६ मधील माजी विद्यार्थीनी आणि विनसीया लाईफ सायन्सेस(पुणे ) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जोशी तसेच १९९१ मधील माजी विद्यार्थिनी आणि क्लिनीकल ट्रायल्स डेटा अँड अॅनालिटीकल्स्, (मुंबई )च्या सल्लागार इंद्राणी काकडे यांना औद्योगिक क्षेत्रातील उत्तम योगदान व कार्यासाठी गौरविण्यात आले.
डॉ. साधना जोशी यांनी विद्यार्थीनींना भारत सरकारद्वारे देण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक शिष्यवृत्तीबद्दल मार्गदर्शन केले.या वेळी पूना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.आत्माराम पवार, उपप्राचार्य व भारती पीसीपी सखी महिला सशक्तीकरण विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा पोखरकर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संयोजन डॉ.मुग्धा सुर्यवंशी यांनी केले.
.