प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे बिबट्याचे कातडे विक्री साठी आलेल्या चंदगड येथील बाबू सखाराम डोईफोडे (वय 57.रा.बांदराई धनगरवाडी तिल्लारीनगर ,ता.चंदगड) व धाकलू बाळू शिंदे (वय 65.रा.रोहिदास गल्ली ,हेरे ता.चंदगड) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी वन्यजीव प्राणी तस्करीच्या अनुशंगाने माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना दिल्या होत्या.
वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाने पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तपास पथके तयार करून तपासाच्या सूचना देऊन मार्गदर्शन केले.सदर पोलिस पथक वन्यजीव प्राणी तस्करीची माहिती घेत असताना पोलिस योगेश गोसावी यांना माहिती मिळाली की,चंदगड येथे बिबट्याची शिकार करून त्याचे कातडे एका प्लास्टिक पोत्यात ठेवून सीडी डिलक्स मोटारसायकल वरुन त्याची विक्री करण्यासाठी कोल्हापूरातील तपोवन मैदान परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून कंळबा रोडवरुन मोटारसायकलवर प्लास्टिक पोते घेऊन येत असलेल्या दोघांना पकडले.त्यांच्याकडे चौकशी केली असता प्रथम त्या दोघांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.त्या दोघांच्याकडे पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली करत वन विभागाच्या अधिकारी यांच्या समक्ष त्यांच्या कडील पोत्याची झडती घेतली असता त्यात बिबट्याचे कातडे मिळून आले.मिळालेले बिबट्याचे कातडे पोलिसांनी ताब्यात घेऊन या दोघांना अटक करून त्याच्या कडील बिबट्याचे कातडे ,40 हजार रुपये किमंतीची मोटारसायकल व 10 हजार रुपये किमंतीचे दोन मोबाईल असा एकूण 50 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर,सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे पोलिस योगेश गोसावी,वैभव पाटील,गजानन गुरव ,महेंद्र कोरवी,अरविंद पाटील,परशुराम गुजरे,शिवानंद मठपती,प्रविण पाटील,संतोष बर्गे ,प्रदिप पाटील,विशाल खराडे,यशवंत कुंभार वन विभागाचे अधिकारी राजेंद्र उलपे,रणजित पाटील व प्रमोद पाटील यांनी केली.