प्रेस मीडिया लाईव्ह :
पुण्यात काँग्रेसचा चर्चेतील एकमेव चेहरा कसबा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला रामराम केला. त्यामुळे पुण्यातील काँग्रेसची अवस्था बुडत्याचा पाय आणखी खोलात गेल्यासारखी झालीये.गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्याच. मात्र, धंगेकरांनी या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं होतं. आता स्वतःच धंगेकरांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसला रामराम केलाय.
धंगेकरांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्यानं 28 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर रवींद्र धंगेकर स्वगृही परतणार आहेत. मात्र WHO IS धंगेकर म्हणत भाजपला कसबा पोटनिवडणुकीत धक्का देणारे धंगेकर नाराज का झाले त्याची काय कारणं होती पाहूया.
धंगेकरांची नाराजी,काँग्रेसला धक्का
- विधानसभा निवडणुकीत धंगेकरांचा कसब्यातून पराभव
- पराभवात काँग्रेसचाच हात असल्याची धंगेकरांची भावना
- पुण्यातील काँग्रेस गटातटाच्या राजकारणात अडकलेली
- ऐन निवडणुकीत काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा असहकार
- धंगेकरांनी स्वत:ची प्रचारयंत्रणा कामाला लावली
- निवडणुकीतील पक्षाच्या कार्यपद्धतीवर धंगेकर नाराज
दरम्यान कारवाई टाळण्यासाठी धंगेकर सत्ताधाऱ्यांबरोबर जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. यासह खंडणी,एसीबीकडे धंगेकरांविरोधात तक्रार करण्यात आलीये.यासह पुण्यात वक्फ बोर्डाची 100 कोटींची मालमत्ता धंगेकर आणि अन्य साथीदारांनी हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर माझी संपत्ती 100 कोटींची असेल तर ज्यांनी आरोप केला आहे त्यांना ही सर्व प्रॉपर्टी द्यायला मी तयार आहे असं धंगेकर यांनी म्हटलंय.