प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने स्वाधारनगर परिसरात असलेल्या हॉटेल मनोरा येथे गांजा अंमली पदार्थांची विक्री साठी आलेल्या सुरज सुभाष चव्हाण (वय 24.रा .राजारामपुरी 14 वी .गल्ली ,को.) याला अटक करून त्याच्या कडील साडे सात कि.वजनाचा गांजा आणि मोटारसायकल असा एकूण दोन लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात अवैद्य व्यवसाय अंमली पदार्थांचा साठा आणि विक्री याची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेच्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पोलिस पथके तयार करून माहिती घेत असताना पोलिस वैभव पाटील यांना माहिती मिळाली की,स्वाधार नगर परिसरातील हॉटेल मनोरा येथे गांजा विक्री करण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून मोटारसायकल वरुन प्लास्टिकच्या पोत्यात गांजा भरून शेंडा पार्क येथून हॉकी स्टेडियमकडे जात असलेल्या इसमास पकडून त्याच्या कडील पोत्याची झडती घेतली असता त्यात गांजा मिळून आला.त्याने बेकायदेशीररित्या विक्री साठी आणलेला पावणे दोन लाख रुपये किमंतीचा 7 कि.85 ग्राम.वजनाचा गांजा आणि 40 हजार रुपये किमंतीची मोटारसायकल व रोख 500/ रुपये.असा एकूण दोन लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा.पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे,पोलिस वैभव पाटील,संतोष बर्गे,अशोक पवार यांच्यासह आदीने केली.