प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- मित्रासोबत विहिरीवर पोहण्यासाठी गेलेला शाळकरी मुलगा पार्थ महेश पाटील (वय 15.रा.गारगोटी ,ता.भुदरगड. सध्या रा.मुक्तसैनिक वसाहत.) याचा आज शनिवार (08 मार्च) रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास काटे मळा परिसरातील डकरे यांच्या शेतातील विहिरीत पार्थ याचा मृतदेह सापडला.त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आला तेथे मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
गारगोटी येथील महेश परीट हे गेल्या मुक्तसैनिक वसाहत येथे आपल्या कुंटुबिया समवेत रहात असून ते लॉड्री चालवितात तर पार्थ याची आई घरकाम करते.पार्थ हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता.शुक्रवार (दि.07 मार्च) रोजी पार्थ आपल्या मित्रासोबत काटे मळा येथील विहिरीत पोहण्यास गेला होता.पोहत असताना पार्थ बडू लागल्याने त्याच्या मित्राने त्याला वाचविण्याचा प्रयत्न करून आरडा ओरडा केला.तेथील नागरिकांनी आणि त्याच्या नातेवाईकांनी घटना स्थळी धाव घेतली.याची माहिती अग्निशामन दलाला मिळताच त्यांनी त्या विहिरीत शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र अंधार पडल्याने शोध मोहिम थांबविली .आज परत पाणबुड्याच्या मदतीने त्याचा शोध चालू केला असता पाणबुड्या (उदय निंबाळकर ) यांना पार्थ याचा मृतदेह मिळून आला.त्यांनी तो मृतदेह पाण्याबाहेर काढ़ला.